नाशिक : शहरात रविवारी (दि. १२) मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा झाल्यानंतर आज सोमवारी (दि. १३) धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.नाशिक शहरात धूलिवंदनाला रंगोत्सव खेळला जात नसला तरी उत्तर भारतीय परंपरेप्रमाणे शहरातील काही भागात रंग खेळणार आहेत. शहरातील नाशिकरोड, सातपूर, अंबड आदि भागात सोमवारी होणाऱ्या रंगोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक रंगाच्या सहाय्याने रंग खेळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आज धूलिवंदन; उत्तर भारतीयांमध्ये उत्साह
By admin | Updated: March 13, 2017 00:32 IST