शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:31 IST

पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे.

त्र्यंबकेश्वर (नाशिक)- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेली संत निवृत्तिनाथांची आषाढी पायी दिंडी आज, सोमवारी सकाळी १० वाजता मोठ्या थाटामाटात पंढरपूरकडे रवाना झाली. निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात विराजमान झाल्यानंतर कुशावर्त तीर्थावर वाजत गाजत नेण्यात आल्या, तेथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली.

पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपूरला पोहोचणार असून १० जुलैला एकादशीला निवृत्तीनाथांची विठुरायाशी भेट होणार आहे. सलग दोन वर्ष कोरोना लॉकडाउन असल्याने पायी दिंडीला पारखा झालेला वारकरी यंदा मात्र पालखीसोबत चालण्यासाठी आतूर झाला होता. विठुरायाच्या ओढीने काही दिवसांपासून वारकरी तयारीला लागले होते.  त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे. 

संत ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरू तथा थोरले बंधु संत निवृत्तिनाथ यांना त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. त्यांनी तो गुरुप्रसाद माउली ज्ञानेश्वरांना दिला येथील पालखी सोहळा शतकोत्तर आहे. दोन दिवसांपासुन भाविक ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी प्रदक्षिणेसाठी जात त्यामुळे शहर गजबजले आहे. वारीसाठी परभणी, बीड, औरंगाबाद, जालनासह मराठावाड्यातून वाहनाने वारकरी भाविक येथे दाखल झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकPandharpurपंढरपूर