शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:42 IST

नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणते आदेश प्राप्त होतात यावर माघारी नाट्य रंगणार आहे. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचे लक्ष : राजकीय नाट्य रंगणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणते आदेश प्राप्त होतात यावर माघारी नाट्य रंगणार आहे. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी २४३ उमेदवारांनी ३४५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची शनिवारी छाननी होऊन २१२ इतके उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये अपक्ष आणि डमी उमेदवारांच्या अर्जांची संख्या मोठी आहे. युती, आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची अर्ज दाखल केल्यानंतरही अनेक बंडखोरांचे अर्ज असल्यामुळे ऐनवेळी कोण माघार घेणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष असणार आहे. नाशिक शहरात सर्वाधिक हायव्होल्टेज ड्रामा नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही मतदारसंघांत पहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे येवला, दिंडोरी, कळवण या मतदारसंघांतूनदेखील कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे लक्ष असणार आहे.अर्ज छाननीनंतर नांदगावमधून २८, मालेगाव (मध्य) १४, मालेगाव (बाह्य)११, बागलाण १५, कळवण ८, चांदवड १४, येवला १४, येवला १४, सिन्नर १०, निफाड ९, दिंडोरी ८, नाशिक पूर्व १४, नाशिक मध्य १०, नाशिक पश्चिम २९, देवळाली १६, इगतपुरी १२ याप्रमाणे २१२ अर्ज वैध ठरलेले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक