शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

तुकाराम मुंढे समर्थकांचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:15 IST

महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? याचे उत्तर अधांतरी असताना दुसरीकडे बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी आक्रमक झाले असून, शक्तिप्रदर्शनासाठी सोशल मीडियावर जोर धरला आहे.

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? याचे उत्तर अधांतरी असताना दुसरीकडे बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी आक्रमक झाले असून, शक्तिप्रदर्शनासाठी सोशल मीडियावर जोर धरला आहे. येत्या गुरुवारी (दि.२९) काढण्यात येणाऱ्या मोर्चात ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया, विश्वंभर चौधरी यांच्यासह अन्य अनेक मान्यवर यात सहभागी करण्यात आले आहे.महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली ही अन्याय असून, त्यांना पूर्णकाळ मिळावा यासाठी गेल्या आठवड्यातदेखील आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता गुरुवारी (दि.२९) खºया अर्थाने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, त्यासाठी विविध संघटना आणि थेट नागरिक यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आंदोलने करण्यात येणार आहेत. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून जोरदार मुंढे बदली प्रकरणी राज्य सरकार आणि भाजपा तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांवर हल्ले करण्यात येत असून, मुंढे यांची बदली का केली याचा जाब विचारला जात आहे.‘मुंढे तुमचे चुकलेच’ या शीर्षकाखाली त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. मुंढे यांनी प्रस्तावित केलेल्या योजना या पारदर्शी होत्या त्याला आता टक्केवारीचे ग्रहण लागेल, तसेच प्रशासन खिळखिळे होईल, ई-कनेक्टवर तक्रार केली म्हणून आता कोणी कर्मचारी त्याची दखल घेऊन मुंढे यांच्या धास्तीने प्रश्न सोडविणार नाहीत, अशा अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. मुंढे यांनी करवाढ केली, अतिक्रमणे हटविली, बेकायदेशीर मिळकती उघड केल्या याबाबत होत असलेल्या टीकेबाबत विविध व्यावसायिक, विक्रेते सामाजिक, कामगार संघटनांना समजावून घेऊन त्यांना मोर्चात सहभागी करून घेतले जात आहे.जनहित याचिका दाखल करण्याची तयारीप्रशासकीय कारण देऊन तुकाराम मुंढे यांची नऊ महिन्यांत बदली करण्यात आल्याचे निमित्त करून आता जनहित याचिका दाखल करण्याचीदेखील तयारी सुरू आहे. मुंढे यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती असल्याने पूर्ण कालावधी त्यांना मिळावा यासाठी गुरुवारी (दि. २७) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.आयुक्तपदासाठी अनेक नावांची केवळ चर्चाचमहापालिकेच्या आयुक्तपदी राधाकृष्ण गमे अथवा राधाकृष्णन बी. यांच्या नावाची चर्चा असताना दुसरीकडे मात्र अद्यापही अनेक नावांची चर्चा असून, त्यात नव्याने भर पडली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाचादेखील कस लागल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे