शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 00:57 IST

पिंपळगाव बसवंत  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत.  मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून, शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेचा धसका : तासन्‌तास उभे राहूनही मिळेना लस

पिंपळगाव बसवंत :  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत.  मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून, शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनामार्फत कोरोना निर्बंधदेखील लादले जात आहेत.   त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवून कडक निर्बंध लावण्यात आले असतानादेखील  रुग्ण संख्या वाढत  आहे. ऑक्सिजन बेड व इंजेक्शनचा वेळेत पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत.  त्याला प्रतिबंधक घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. पिंपळगाव शहरात एकच लसीकरण केंद्र असल्याने आरोग्य केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची तुडुंब गर्दी वाढू लागली आहे. त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसत आहे.  त्यामुळे प्रशासनाने अजून लसीकरण केंद्र वाढवून लसीकरण करावे मागणी नागरिकांकडून  होत आहे.लसीकरणासाठी अपुरे डोस लसीकरणाचे अपुरे डोस असल्याने तासन्‌तास रांगेत उभे राहिल्यावरही लस न मिळाल्याने अनेकांना माघारी परतावे लागते. डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसू लागला आहे. दरम्यान, ऑनलाइन नोंदणीशिवाय नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर येऊच नये, असे आवाहन प्रशासनाने करणे गरजेचे आहे. मात्र लोक केंद्रावर तुडुंब गर्दी करत आहे.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस