शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘टायर प्लॅन्ट’ मोजतोय घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:41 IST

राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत. त्यातही कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने महामंडळाला सदर प्रकल्प चालवायचा आहे की बंद करायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.राज्य परिवहन महामंडळाचे राज्यात विविध ठिकाणी नऊ प्रकल्प असून, नाशिकमध्येदेखील टायर नूतनीकरणाचा प्रकल्प आहे.या प्रकल्पाची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. पूर्वी चोवीस तास चालणाºया या प्रकल्पात जवळपास ९५ कर्मचारी कार्यरत होते. तीनही सत्रामध्ये चोवीस तास प्रकल्प चालविला जात होता. परंतु महामंडळाच्या खासगीकरण धोरणामुळे कर्मचाºयांची संख्या कमी करण्यात आली आणि प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच अवकळा आली. त्यामुळे तीन शिफ्ट चालणार हा प्रकल्प काही दिवस दोन शिफ्टमध्ये आणि आता तर एकच शिफ्टमध्ये अवघ्या दहा कर्मचाºयांवर सुरू आहे. या कर्मचाºयांना दैनंदिन प्रॉड््क्शन नियमानुसार ३५ ते ४० टायर्सचे नूतनीकरण करून द्यावेच लागते. त्याचा ताण या कर्मचाºयांवर येत असल्याच्या तक्रारी आहेत.राज्य परिवहन महामंडळात अनेक बदल होत असताना काही बदलांचे निश्चित स्वागत करण्यात आले, मात्र खासगीकरणाच्या निर्णयामुळे अनेक कर्मचाºयांना मूळ अस्थापना सोडून अन्यत्र कामे करावी लागत आहेत. अगदी स्वच्छतेपासून ते तांत्रिक कर्मचाºयांच्या कामांमध्येही बदल करण्यात आला. एवढे करूनही महामंडळाला नेमका काय लाभ झाला याचा कोणताही हिशेब महामंडळाने मांडलेला नाही. खासगीकरणातून अनेक कामे महामंडळात सुरू झाली असताना टायर प्लॅन्टच्या बाबतीतही असाच काहीसा निर्णय होण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र नियमित कर्मचाºयांना बसत असून, त्यांना कमी मनुष्यबळात राबवून घेतले जात आहे. या कर्मचाºयांना शाश्वत कामाची अपेक्षा असल्याने विभाग नियंत्रकांनी त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. महामंडळातील अनेक कामांचे खासगीकरण होत असताना टायर प्लॅन्ट तर बंद करण्याचीच चर्चा होत आहे. यामुळे कर्मचाºयांच्या कामावर गदा येणार असल्याने महामंडळाच्या मनुष्यबळात प्लॅन्ट सुरू ठेवावा, अशी मागणी आहे.अन्य कर्मचाºयांच्या नियुक्तीची मागणीटायर प्लॅन्टमध्ये असलेल्या किरकोळ कामांसाठी नवीन भरती झालेल्या कर्मचाºयांना संधी दिली तर प्लॅन्टमधील नियमित कर्मचाºयांना अधिक उत्पादन देणे शक्य होऊ शकते. सद्यपरिस्थितीत या कर्मचाºयांना पेस्टिंगपासून भट्टीपर्यंतची कामे करावी लागतात. या कामांचे वर्गीकरण होणे अपेक्षित आहे. यासाठी नवीन भरती झालेल्या कर्मचाºयांना टायर प्लॅन्टमध्ये ड्युटी द्यावी, असे जुन्याजाणत्या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.टायर प्लॅन्टमध्ये महिलांच्या क्षमतेनुसार अनेक कामे करण्यासारखी आहेत. शिवाय त्या कौशल्यपूर्ण कामे हाताळू शकत असल्याने त्यांना सामावून घेतले तर अन्य कर्मचाºयांवरील लहानसहान कामाचा ताण कमी होऊन ते अधिकाधिक उत्पादन देऊ शकतील, अशी निदान नाशिक शहरातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. नाशिक पॅटर्न म्हणून राज्यात त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.कामही झाले कमीमहामंडळाच्या टायर प्लॅन्टमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात काम चालत होते. परंतु आता टायर घासण्याचे प्रमाण कमी झाल्याने रिमोल्डिंगही घटले आहे. रस्त्यांची झालेली सुधारणा तसेच ट्युबलेस टायर यामुळे टायरचे आयुर्मान वाढले आहे. त्याचा परिणाम टायर नूतनीकरणावर झाल्याचे बोलले जाते.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक