शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

तिऱ्हळ आरोग्यकेंद्र रामभरोसे

By admin | Updated: September 30, 2014 21:51 IST

तिऱ्हळ आरोग्यकेंद्र रामभरोसे

कनाशी : कळवण तालुक्यातील तिऱ्हळ प्राथमिक आरोग्यकेंद्रात रिक्त असलेल्या पदामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर आरोग्य केंद्राचा रामभरोसे कारभाराचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.तिऱ्हळ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असून, दुसरे वैद्यकीय अधिकारी एका वर्षापासून गैरहजर आहेत तसेच देसगाव व देवळीकर या गावातील उपकेंद्रातील आरोग्यसेवक पदे रिक्त आहेत. देवळीवणी येथील आरोग्यसेवक तीन महिन्यापासून कामावरून बेपत्ता आहे. सदर भाग हा आदिवासी असल्यामुळे विविध कर्मचारी व आधिकारी कित्येक दिवस बेपत्ता असतात, तर बरेच कर्मचारी दांडीबहाद्दर असून, त्याच्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. मात्र वेळेवर पगार काढले जातात. सदर कर्मचाऱ्यांवर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचा कृपाशीर्वाद असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सदर भाग आदिवासी असून, आवो जावो घर तुमारा अशी येथील परिस्थिती झाली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बरेच कर्मचारी दोन-तीन महिने गायब राहूनसुद्धा पगार वेळेवर काढले जातात, असे नागरिक सांगत आहेत. पळसदर येथील उपकेंद्रात आरोग्य सेविकेचे पद रिक्त असून, अतिरिक्त चार्ज एनआरएचएमकडे देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना ताटकळत वैद्यकीय अधिकारीची उपचारासाठी वेळ पाहत असतात. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फटका रुग्णांना बसत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेले आरोग्य केंद्राची इमारत सर्व सुविधांयुक्त आहे. मात्र इमारतीतील शौचालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. शौचालयाअभावी या अद्ययावत केंद्रामध्ये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर आरोग्य केंद्राकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)