शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीत फसवणूक टाळण्यासाठी नाशिकच्या शेतक-यांना टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:26 IST

गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या महोत्सवात सेंद्रीय उत्पादनांना ग्राहकांनी अधिकाधिक पसंती दिली. कृषी महोत्सवात भरविण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली.

ठळक मुद्देकृषी महोत्सव : सेंद्रीय उत्पादनांना चांगली मागणीआयात व निर्यातची आकडेवारी तपासून माल देण्याची सुचना

नाशिक : द्राक्ष, कांदा व डाळींबाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करणा-या जिल्ह्यातील शेतक-यांनी निर्यातीच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा कृषी महोत्सवात या क्षेत्रातील जाणकारांनी शेतक-यांना विविध प्रकारच्या टिप्स दिल्या. त्यात प्रामुख्याने शेतक-यांनी निर्यातदाराची आर्थिक बाजू लक्षात घेण्याबरोबरच गतवर्षीच्या आयात व निर्यातची आकडेवारी तपासून माल देण्याची सुचना यावेळी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या महोत्सवात सेंद्रीय उत्पादनांना ग्राहकांनी अधिकाधिक पसंती दिली.कृषी महोत्सवात भरविण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली. विविध उद्योग समुह,निर्यातदार, परदेशी कंपन्या असे २५ खरेदीदार यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी विविध उत्पादनांबाबत असलेल्या अपेक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर निर्यातदारांनी सखोल माहिती दिली. आर्थिक व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणून करार पद्धतीचा अवलंब केल्यास शेतक-यांची फसवणूक टळेल असा सल्लाही देण्यात आला. यावेळी द्राक्ष, कांदा, डाळींब, टोमॅटो, मिरची, पॅकेजिंग विषयाशी संबंधित शेतकरी आणि खरेदीदार यांची समोरासमोर चर्चा ठेवण्यात आली. आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी शेतक-यांनी व्यवस्थितरित्या खरेदीदाराची माहिती घेऊन मालाची विक्री करताना कायदेशीर करार करावा असे सांगितले. खरेदीदारांनी शेतक-यांच्या मालाला चांगला दर मिलावा यासाठी शेतक-यांना सहकार्य करावे आहे आवाहनही त्यांनी केले. गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या भागातून एक हजार मेट्रीक टन आंब्याचे संकलन करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक