शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

बस तिकिटावरून खुनाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:41 AM

मुंबई-आग्रा महामार्गावर चिखल ओहोळ शिवारात अज्ञात व्यक्तीचे प्रेत सापडल्यानंतर त्याच्या खिशात सापडलेल्या बसच्या तिकिटावरून पोलिसांनी तपास केला आणि खुनाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी मृताची पत्नी आणि वाहनचालक यांना अटक केली असून, अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देबेवारस मृतदेह : धुळे येथून पत्नी, वाहनचालकास अटक; प्रियकर फरार

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चिखल ओहोळ शिवारात अज्ञात व्यक्तीचे प्रेत सापडल्यानंतर त्याच्या खिशात सापडलेल्या बसच्या तिकिटावरून पोलिसांनी तपास केला आणि खुनाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी मृताची पत्नी आणि वाहनचालक यांना अटक केली असून, अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.सोमवार, दि. ४ मार्च रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर चिखळ ओहोळ शिवारात एक ३५ ते ४० वयोगटांतील अज्ञात पुरुषाचे प्रेत सापडले होते. मयत इसमास अज्ञात आरोपींनी जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत महामार्गावर सुमसान ठिकाणी टाकले व मयताच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून घटनास्थळावरील वाळलेले गवत पेटवून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिकच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मृताच्या अंगावरील वस्तुंचे परीक्षण केले, त्यात मयताच्या पॅण्टच्या खिशात दोंडाईचा ते धुळे असे बसचे तिकीट आढळले. त्यावरून पोलिसांचा तपास पुढे सरकला.गुन्हे शाखेचा पथकाने धुळे जिल्ह्यात धाव घेतली व मृताच्या वयाशी व वर्णनाशी साम्य असलेल्या हरविलेल्या व्यक्तींची पडताळणी केली. मृत इसम हा दोंडाईचा येथे धुळे बसस्थानक परिसरात उतरलेला होता. पथकाने धुळे बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून त्यात मृताच्या फोटो काढून धुळे शहरात मयताची ओळख पटविण्यासाठी गस्त सुरू केली. दरम्यान, धुळे शहरातील शनिनगर परिसरातील एक इसम काही दिवसांपासून बेपत्ता असून, तो ट्रॅव्हल्सवर काम करत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यावरून चौकशी केली असता मयत इसम हा महेंद्र काशीनाथ परदेशी (रा. शनिनगर, धुळे) असल्याचे तपासात निष्पन्न झाले.मृताची ओळख पटल्यानंतर माहिती घेतली असता मयताचे त्याच्या पत्नीशी एका इसमावरून वाद असल्याचे समजले. त्यावरून मयताची पत्नी रूपाली महेंद्र परदेशी हीस ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी केली असता, दि.२ मार्च २०१९ रोजी सायंकाळचे सुमारास मयत महेंद्र व त्याची पत्नी रूपाली यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी महेंद्र याने दारू पिऊन पत्नीस शिवीगाळ करून तिचा मित्र कैलास वाघ हा घरी का येतो यावरून मारहाण केली होती. दरम्यान, रात्री रूपालीने मित्र कैलास वाघ यास बोलाविले. कैलास वाघ घरी आल्याने महेंद्र याने रूपाली व कैलास यास पुन्हा शिवीगाळ केली. तेव्हा दोघांमध्ये झटापट झाली. त्यामुळे कैलास याने महेंद्र याच्या पाठीवर, बरगडीवर मारहाण केली. त्याच्या तोंडातून रक्त निघाल्याने व तो काहीही हालचाल करत नसल्याने महेंद्र हा मयत झाल्याची जाणीव झाली. तेव्हा कैलास वाघ याने मयत महेंद्र यास चादरीने झाकून टाकले व मयताची पत्नी रूपाली हीस घरीच झोपून रहा, असे सांगितले. दरम्यान, दि. ३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कैलास वाघ याने त्याचा मित्र बबलू चव्हाण व इतर दोन साथीदारांना ओमिनी गाडीने बोलावून घेऊन मयत महेंद्र याचे चादरीने गुंडाळलेले प्रेत गाडीत टाकले व प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मयत महेंद्र याचे प्रेत मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव शिवारात फेकून दिले असल्याची कबुली दिली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील आहिरे, चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण, रतिलाल वाघ, दत्ता माळी, भारती सोनवणे यांच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.प्रेमसंबंधाची दिली कबुलीरूपाली व तिचा मित्र कैलास वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याचे रूपालीने कबूल केले. रूपाली महेंद्र परदेशी (रा. शनिनगर, धुळे), कैलास शंभू वाघ ऊर्फ कैलास काका (रा. धुळे ) व कैलास वाघ याचे इतर दोन साथीदार यांनी प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी सुमसान जागेवर फेकून दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.४याप्रकरणी रूपाली महेंद्र परदेशी व धनेश महादेव चव्हाण ऊर्फ बबलूयांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. तसेच इतर आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी