शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात ऐनवेळी बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 01:40 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथम वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र, या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, विद्यापीठाकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या विद्यार्थी अपात्रतेविषयीच्या पत्राचे कारण देत उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी पेच निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय :परीक्षा केंद्रावर पोहोचलेलेल्या विद्यार्थ्यांची निराशा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथम वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र, या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, विद्यापीठाकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या विद्यार्थी अपात्रतेविषयीच्या पत्राचे कारण देत उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी पेच निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना मंगळवार (दि.१२) पासून सुरुवात होऊन या परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार होत्या. मात्र, होमिओपॅथी विद्याशाखेचा मंगळवारी पहिला पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठाने ऐनवेळी हा पेपर रद्द करून वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध विद्याशाखांच्या उन्हाळी २०२१ सत्राच्या परीक्षा राज्यातील विविध १७७ परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार (दि.१२) होमिओपॅथी विद्याशाखेची परीक्षा सुरू होणार होती; परंतु प्रशासकीय कारणास्तव यात बदल करण्यात आला आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाला प्राप्त पत्रानुसार उशिरा प्रवेशित झालेले काही विद्यार्थी या परीक्षेला पात्र नसल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेअभावी परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी पेच निर्माण झाला होता. पहिल्या दिवसाच्या पेपरसाठी १५६ विद्यार्थी अपात्र ठरून परीक्षेपासून वंचित राहणार असल्याने ही परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी (दि. १३) प्रवेश नियामक प्राधिकरणाची मुंबई येथे बैठक होणार असून, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी निर्णय झाल्यानंतर सर्वच विद्याशाखांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याविषयी परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करण्यासंदर्भातही विद्यापीठाकडून सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यEducationशिक्षणexamपरीक्षा