शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात  भाव घसरल्याने टोमॅटो फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:50 IST

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे.

पंचवटी : नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे. बाजारभाव मिळत नसल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेला टोमॅटो वाटेतच फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आल्याने ते हवालदिल झाले आहेत.गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रतिजाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्चदेखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.जाळीला ३० ते ४० रुपये दरजिल्ह्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना आता त्यातच वाढत्या महागाईमुळे शेतकºयावर अस्मानी संकटानंतर आता उभ्या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने दुहेरी संकट ओढावले आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत टोमॅटो बाजार गडगडल्याने शेतकºयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शेतात तयार झालेला टोमॅटो विक्रीसाठी बाजारात नेल्यानंतर जाळीला ३० ते ४० रुपये असा मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी तेथेच टोमॅटो सोडून काढता पाय घेत आहे तर काहींना हातात मिळेल ती रक्कम घेऊन समाधान मानावे लागत आहे. बियाणे, लागवड खर्च तसेच वाहतूक भाडेदेखील सुटत नसल्याने यंदा टोमॅटो उत्पादक शेतकºयांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या आदिवासी खेडेगावातील काही शेतकरी बांधवांनी तर शेतातील उभ्या टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजारvegetableभाज्या