शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना यंदा रडवणार कांदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 15:13 IST

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्हाळ कांद्याची सद्दी संपलेली असते. म्हणजेच पोळ कांदा बाजारात आल्यावर बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहतात.

ठळक मुद्देपोळवर परिणाम : उन्हाळ कांद्याचेही उत्पादन घटणारलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांद्याचा तुटवडा व वाढलेले दर यावरच विरोधकांकडून भर

नाशिक : जुलै व आॅगष्टच्या मध्यान्हापर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे याच पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड करणाऱ्या शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळण्याबरोबरच पोळचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणीतीही शाश्वती सध्या तरी देता येत नसल्यामुळे पुढच्या वर्षी ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संभाव्य भाववाढीने कांदा राजकारण्यांना चांगलाच रडवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्हाळ कांद्याची सद्दी संपलेली असते. म्हणजेच पोळ कांदा बाजारात आल्यावर बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहतात. परंतु यंदा पोळ कांदा पिकविणा-या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केली असून, पावसाच्या पाळ्यावर नजर ठेवून कांदा लागवड करणा-या शेतक-यांनी जी काही पोळ कांद्याची लागवड केली आहे, त्यांना कांदा टिकविण्यासाठी पावसाची गरज आहे तर ज्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे त्यांनी अद्याप लागवड केलेली नाही. त्यामुळे पोळ कांद्याचे पीक पावसाअभावी धोक्यात आले आहे, त्याच बरोबर जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाºया पावसावर भिस्त ठेवून आॅक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये उन्हाळ कांद्याची लागवडीवर देखील सध्याच्या अपुºया पावसाचा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. उन्हाळ कांदा साधारणत: फेब्रुवारी ते मार्च दरम्यान बाजारात येतो, तो पर्यत साठवणुकीयोग्य नसलेला पोळ कांदा बाजारातून संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे येणा-या आठ ते नऊ महिन्यात ग्राहकांच्या चवीची जबाबदारी पेलणाºया उन्हाळ कांद्याच्याही लागवडीवर आता परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.कांद्याची दरवाढ वा कांद्याचे कोसळलेल्या भावाचा बाजारपेठेवर ज्या पद्धतीने परिणाम होतो तसाच परिणाम भारतीय राजकारणावरही झाल्याची आजवरची अनेक उदाहरणे असून, पोळ कांद्याचे घटणारे उत्पादन व उन्हाळ कांद्याची कोणतीही शाश्वती सद्या दिसत नसल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांद्याचा तुटवडा व वाढलेले दर यावरच विरोधकांकडून भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकारण्यांना कांदा रडवणार असे चित्र दिसू लागले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक