शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:22 IST

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.

देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.गतवर्षी पावसाळ्यात चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे वाजगाव येथील विहिरींना पाणी उतरले होते. रब्बीचा हंगाम पदरात पडेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. कारण कांदा लागवडीच्या वेळी या शेतकºयांच्या विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यात कालव्याला एक आवर्तन सोडले जात होते. यामुळे कांदा पीक सहज निघून येईल या भरवशावर शेतकरी होते.जानेवारी महिन्यात देवळा येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले असताना वाजगाव येथील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या पुढे कैफियत मांडली होती. त्यावेळी महाजन यांनी कालव्याला पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापपर्यंत कालव्याला आवर्तन सोडण्यात आले नाही. महिनाभरापासून वाजगाव परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकºयांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे शेतकºयांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही. यामुळे कालव्याला नियमित आवर्तने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीonionकांदा