पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील रेणुकादेवीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षीसारखे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. सप्तशृंगगडावरून आणलेल्या ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली नाही. तमाशा तसेच कुस्ती दंगलीही रद्द करण्यात आल्या. यात्रोत्सव रद्द झाल्याने यावर अवलंबून असलेल्या घटकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. खेळणी तसेच मिठाईची दुकाने लावता न आल्याने अनेक कुटुंबांचा रोजगार बुडाला तर खरेदी करता आली नाही म्हणून नागरिकांसह भाविकांचा हिरमोड झाला. केवळ जेमतेम दोन-तीन दुकानेच थाटण्यात आली होती.कोट... यात्रेत भेळभत्ताच्या दुकानात दरवर्षी उत्तम धंदा होतो. मात्र यावर्षी यात्रा रद्द झाल्याने फटका बसला आहे. मालासाठी लावलेले पैसेदेखील निघणे अवघड आहे.- उत्तम पवार, व्यावसायिक, लासलगाव(फोटो ०२ पिंपळगाव लेप)पिंपळगाव लेप (ता. येवला) येथील ग्रामदैवत रेणुकादेवीची मूर्ती.
यात्रा रद्द झाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:37 IST
पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील रेणुकादेवीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षीसारखे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता.
यात्रा रद्द झाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
ठळक मुद्देदरवर्षीसारखे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला