शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:29 IST

गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

गिरणारे : गिरणारे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या व जलशिवारातील पाणी अडवून कृत्रिमरीत्या पाणवठे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला; परंतु ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी होणारी वणवण आजही कायम असून, काही गावांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.नाशिक तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ते, रोहिले, लव्हाळीपाडा, हिरडी, पिंपरी, माळेगाव, गणेशगाव या वाड्या-वस्त्यांमध्ये मार्चपासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. आदिवासी व महिलावर्ग रात्रंदिवस पाण्यासाठी भटकत आहेत. या भटकंतीमुळे व सध्या वाढत असलेल्या उन्हाच्या दाहकतेमुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले आहे.  मागील काही दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढूनही उन्हाळा येताच डोंगरमाथ्यासह सखल भूभागातदेखील पाण्यासाठी दाहीदिशा होत असलेली भटकंती अद्याप दूर झालेली नाही. शासन यंत्रणा मात्र टंचाई नसल्याचे चित्र रंगवीत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी टँकरचे प्रस्ताव अटी-शर्तींच्या नावाने फेटाळले जात आहेत. सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती होत असताना शासन टँकर देत नाही. दोन किमी परिसरात पाणी असल्याचे कारण पुढे करण्यात येते.बेसाल्ट खडकामुळे पाणी झिरपण्यास बाधागेल्या काही वर्षांतील नळपाणीपुरवठा योजनांचे स्रोत पूर्णत: बदलले आहे. तालुक्यातील बहुतांश भाग बेसाल्ट खडकांचा असल्याने पाणी झिरपा होत नाही. पावसाळ्यात पाणी वाहून जाते. पाणवठा असणाºया जागा कोरड्या पडल्या आहेत. यातून भविष्यातील पाण्याची असलेली भीषणता आपल्यासमोर येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वीदेखील जलसंधारणाच्या नावाने कामे झालेली आहेत.हिरडी येथे पाणी विकत घेण्याची वेळगिरणारे जवळील हिरडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने व पाण्याचा उद्भव नसल्याने गावातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी १०० रुपये टिपाड याप्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई