शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

कळवणच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:52 IST

कळवण : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने सर्वच तालुक्यात हातपाय पसरले असले तरी कळवण तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून, शहर व तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन नियमांचे पालन केले, औषधोपचार घेतले तर कोरोनावर मात करता येऊ शकते हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्दे जनजीवन पूर्वपदावर : नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने सर्वच तालुक्यात हातपाय पसरले असले तरी कळवण तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून, शहर व तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन नियमांचे पालन केले, औषधोपचार घेतले तर कोरोनावर मात करता येऊ शकते हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.जुलैअखेर तालुक्यात २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. या दरम्यान १२८ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात १०६ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले होते. सर्वप्रथम कळवण तालुक्यात आढळून आलेल्या ११ वर्षीय बालकात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ९ मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ११ वर्षीय बालक पूर्णत: ठणठणीत झाले होते.नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पहिला रुण लक्षणे मुक्त असल्याने आणि नवीन रुग्ण नाही तसेच संशयितसुद्धा नाही. त्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला होता. या रुग्णाला कुठलीही प्रवास हिस्ट्री नव्हती. त्याचे वडील शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे त्यावेळी खबरदारी म्हणून संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. शहर व तालुक्यात धाकधूक वाढली असताना रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील तपासणीसाठी पाठवण्यात आलेले सर्व नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कळवणकरांना मोठा दिलासा मिळाला होता. आमदार नितीन पवार यांच्यासह तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत खैरे, नगरपंचायतीचे तत्कालीन तालुक्यात एकही बाधित नाहीनाशिक शहरासह जिल्हाभरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना जिल्हा सामान्य रु ग्णालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली असून, कळवण तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.शहरात मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांनी प्रशासकीय नियोजन करून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी, दक्षता घेण्याच्या सूचना, आरोग्य विभागाकडून परिसराचा सर्वेक्षण, नगरपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात जंतुनाशक फवारणी, परिसर कंटेन्मेंट झोन करून यंत्रणा सतर्क ठेवली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या