शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 धाड टाकून  भोंदू तांत्रिकाकडून ३४ तोळे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:48 IST

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा रहिवासी उदयराज रामआश्रम पांडे या भोंदू तांत्रिकाच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या असून, त्याने जमविलेली ‘माया’ बघून पोलीस अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे त्याच्या सुनेच्या घरी व दोन सराफांच्या दुकानांमध्ये पुन्हा धाड टाकून सरकारवाडा पोलिसांनी ३४ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

नाशिक : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा रहिवासी उदयराज रामआश्रम पांडे या भोंदू तांत्रिकाच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या असून, त्याने जमविलेली ‘माया’ बघून पोलीस अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे त्याच्या सुनेच्या घरी व दोन सराफांच्या दुकानांमध्ये पुन्हा धाड टाकून सरकारवाडा पोलिसांनी ३४ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत.  नितीन फिरोदिया यांच्या घरात त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीला जबरी चोरी करण्यास भाग पाडणाºया भोंदू तांत्रिकाला सरकारवाडा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सुरुवातीला आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास पथकाने त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मूळ गावी जौनपूरला जाऊन वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करून हडपलेले ३९० ग्रॅम सोन्यासह गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, बुलेट हस्तगत केली होती. त्याने विविध पूजापाठाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करून गडगंज संपत्ती जमविली असल्याचे तपासात उघड झाले आहे.  जौनपूर येथील त्याचा सुमारे ५० लाखांचा आलिशान बंगला बघून तपास पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर संशयित आरोपी भोंदूबाबाची पुन्हा सात दिवस पोलीस कोठडी न्यायालयाकडून मिळविली. सरकारवाडा पोलिसांनी जौनपूरला जाऊन सुनेकडे दिलेले सहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह येथील दोन सराफांना विकलेले सोने-चांदीचे दागिने असे एकूण ३४ तोळे सोनेव एक किलो चांदी दागिन्यांच्या स्वरूपात हस्तगत करण्यात यश आले आहे.  सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्याकडे आहे. त्यांच्या पथकाने सदर कामगिरी पार पाडली.  एकूणच या गुन्ह्यात संशयित आरोपीची संपूर्ण पंधरा दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मिळवून कारवाई पूर्ण केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली. भोंदूबाबाकडून आतापर्यंत एकूण ८०० ग्रॅम सोने, एक किलो चांदी, एक मोटार व दुचाकी मिळून एकूण २९ लाखांचा मुद्देमाल सरकारवाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा