शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन विजय'चा थरार; युद्धभूमीवर भारतीय सैनिकांकडून शत्रुची छावणी उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 11:18 IST

नाशिक येथील गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला.

नाशिक : येथील गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होते, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या ३७व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे. यावेळी सैनिकांनी ऑपरेशन 'विजय'ची झलक प्रात्यक्षिकांद्वारे दाखविली.

गांधीनगर येथे स्थित कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात बुधवारी सकाळी ९ वाजता दीक्षांत सोहळ्याला लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनने  सुरुवात झाली. ३७ प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या या तुकडीने अत्यंत शिस्तबद्ध असे परेड सादर करत वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना 'एव्हीएशन विंग' व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल तथा आर्मी एव्हीएशनचे डायरेक्टर जनरल कर्नल कमांडन्ट अजयकुमार सुरी हे उपस्थित होते. 

या तुकडीचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या कॅप्टन अभिलाषा बराक. आर्मी एव्हीएशनमधून भारतीय सैन्यात अभिलाषा यांच्या रूपाने पहिली महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक दाखल झाली. त्यांनाही एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे अभिलाषा या 'फ्लेजलिंग' ट्रॉफीच्या मानकरी ठरल्या. 

त्या २०१८ साली त्या चेन्नई येथून भारतीय सैन्य दलात भरती झाल्या. दरम्यान  त्यांची राष्ट्पती रामनाथ कोविंद यांच्यासमोर होणाऱ्या हवाई  प्रत्यक्षिकासाठी कमांडर म्हणून निवड झाली. या बहुमानानंतर २०१८ साली त्यांनी चेन्नईच्या अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण करत आर्मी एव्हीएशन कॉर्प्सची निवड केली. त्यानंतर त्या नाशिकच्या 'कॅट्स'मध्ये दाखल झाल्या. पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे लढाई हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. मूळच्या हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्याच्या रहिवासी आहेत,त्यांचे वडील आणि भावाने ही सैन्यदलात सेवा बजवली आहे..  

दीक्षांत संचलनानंतर चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरची थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली, हेलिकॉप्टरमधून  युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, शत्रूच्या तळावर मोर्टर तोफेतून बॉम्बगोळा डागणे अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी भारत मातेचा जयघोष करत टाळ्यांचा कडकडाट केला. 

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवान