शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

मोहदरी घाटात बर्निंग बसचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 02:04 IST

नाशिकहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करून प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवितहानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देबस जळून खाक : सुदैवाने जीवितहानी नाही

सिन्नर : नाशिकहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करून प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवितहानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषद अग्निशमन बंबांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविली.

श्रीहरी दत्तात्रय कुलकर्णी (रा. म्हसरुळ, नाशिक) हे खासगी लक्झरी बस (क्र. एमएच ०९ पी.बी. ३०५९) नाशिकहून कोल्हापूरकडे भाविकांना घेऊन जात होते. बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी होते. नाशिकहून निघालेली बस रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात आली असता, बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले.

प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर आल्यानंतर कुलकर्णी यांनी सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला तसेच एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही अग्निशामक बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचले व काही वेळात आग विझविण्यात आली. चालक कुलकर्णी यांनी प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना आगी लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. गेल्या महिन्यात पांढुर्ली घाटात धावत्या चारचाकीला आग लागून चालकाचा मृत्यू झाला होता. दुसऱ्याच दिवशी नांदूरशिंगोटे रस्त्यावर चारचाकीने पेट घेऊन आगीत भस्मसात झाली होती. एप्रिल महिन्याच्या शेवटी मोहदरी घाटात कार पेटण्याची तसेच सोमवारी गुरेवाडी शिवारात दुचाकीने पेट घेतल्याने देशवंडी येथील तरुणाचा मृत्यू झाला तर शुक्रवारी रात्री खासगी लक्झरी बस पेटली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधनाने प्रवाशांचा जीव वाचला.

 

इन्फो

 

वाहतूक कोंडी

 

नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात पावणेदहा वाजेच्या सुमारास खासगी बस पेटल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार प्रकाश उंबरकर, मिलिंद शिरसाट, चालक खिळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोदरी घाटात धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मदत कार्य केले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी दूर झाली होती.

टॅग्स :NashikनाशिकfireआगBus Driverबसचालक