शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:57 IST

त्र्यंबकेश्वरला देवदर्शनासाठी आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलास दुचाकीवरून येत मारहाण करून लुटणाºया तिघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली़ राहुल निवृत्ती तुपलोंढे (२२, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश हिरामण पारधी (२३, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), अक्षय संजय धोंगडे (२४, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे़ पोलिसांनी या संशयितांकडून चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़

नाशिक : त्र्यंबकेश्वरला देवदर्शनासाठी आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलास दुचाकीवरून येत मारहाण करून लुटणाºया तिघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली़ राहुल निवृत्ती तुपलोंढे (२२, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश हिरामण पारधी (२३, रा. त्र्यंबक पिंप्री, ता. त्र्यंबकेश्वर), अक्षय संजय धोंगडे (२४, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे़ पोलिसांनी या संशयितांकडून चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयातील वकील सत्यम हरबन्सलाल अरोरा (रा. रामप्रस्थ, जि. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) हे २४ आॅक्टोबर २०१८ रोजी त्र्यंबकेश्वरला पूजाविधीसाठी आले होते़ स्वामी समर्थ कमान ते गुरुद्वारा या परिरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला होता़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़  गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, नवनाथ गुरुळे, चंद्रभान जाधव, राजू दिवटे, जालिंदर खराटे, संदीप हांडगे, लहू भावनाथ, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने ही कारवाई केली़स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे या दोन्हींकडून सुरू असलेल्या तपासात गुन्हे शाखेला एका संशयिताची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली़ त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे़

टॅग्स :Policeपोलिसtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरCrime Newsगुन्हेगारी