शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चोर समजून युवकाचा खून करणाऱ्या तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:43 IST

नाशिक : चोर समजून केलेल्या मारहाणीत श्याम श्रीराम चकोर (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात घडली होती़ या प्रकरणातील आरोपी फुलन रामभवन राय, राधिका फुलन राय, रामविलास शिवपुंजन राय (सर्व रा. परमोरी शिवार, बॉटल कंपनी गोदाम, ता. दिंडोरी. मूळ रा. दिवाकलपूर पोस्ट नरैना, ता. सकलडिया, जि. चांदोली, उत्तर प्रदेश) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी मंगळवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

ठळक मुद्देचोर समजून मारहाण ; दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात घडली घटना पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंड,

नाशिक : चोर समजून केलेल्या मारहाणीत श्याम श्रीराम चकोर (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात घडली होती़ या प्रकरणातील आरोपी फुलन रामभवन राय, राधिका फुलन राय, रामविलास शिवपुंजन राय (सर्व रा. परमोरी शिवार, बॉटल कंपनी गोदाम, ता. दिंडोरी. मूळ रा. दिवाकलपूर पोस्ट नरैना, ता. सकलडिया, जि. चांदोली, उत्तर प्रदेश) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी मंगळवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

मयत श्याम चकोर याची आई लीलाबाई चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा श्याम हा २३ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी आतेभावासमवेत लखमापूर फाट्यावर जाऊन रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी परतला होता़ रात्रीच्या जेवणानंतर घराबाहेर झोपला होता, मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तो आढळून आला नाही़ तसेच दुसºया दिवशी परमोरी शिवारातील बॉटल कंपनीच्या गुदामाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिघा संशयितांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड़ रवींद्र निकम यांनी अकरा साक्षीदार तपासले़ यामध्ये खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नसला तरी मुख्य आरोपी फुलन राय याने दोन साक्षीदारांना केलेल्या फोनवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शाबीत झाला़ या तिघांनाही पाच वर्षे सक्तमजुरी व २४ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे़

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकPoliceपोलिस