शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३५ शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 02:04 IST

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१५ जणांचे वेतन रोखले अल्पसंख्याक शाळांमधील १८ जण बचावले

नामदेव भोर ।नाशिक : जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. मात्र. यातील १८ शिक्षक अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत असल्याने बचावले असून, अन्य दोन शिक्षक अनुकंपातत्त्वावर असल्याने त्यांचे वेतन नियमितपणे सुरू राहणार आहे, तर १५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखण्यात आले आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीईटी) राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, त्यापूर्वीच २०१५ मध्ये केंद्र सरकारने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी चार वर्षांची मुदतवाढ दिल्याने राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर करीत ३० मार्च २०१९ पर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने जानेवारी महिन्याचे वेतन काढण्यापूर्वी १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती मागविली होती.त्यातून जिल्ह्णातील खासगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे ५० शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे समोर आले असून, १५ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिलेल्या मुदतीत उत्तीर्ण केल्याचे स्पष्ट झाले, तर अन्य ३५ शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असतानाही सेवेत कार्यरत आहेत. यातील १८ शिक्षक हे अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत आहेत, तर अन्य दोन शिक्षक अनुकंपातत्त्वावर रुजू झाले आहेत. अशा शिक्षकांना शासन निर्णयातून वगळले असल्याने त्यांचे वेतन कायम ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ शिक्षकांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने दिली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारTeacherशिक्षक