ंमालेगाव : जनावरांची चोरी करून त्यांची बेकायदेशीररीत्या कत्तल करणाऱ्या सलीमनगर भागातील तीन जणांना आयेशानगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार गोऱ्हे व कातडी जप्त करण्यात आली. उबेद अहमद निहाल अहमद, रा. नया इस्लामपुरा यांनी फिर्याद दिली. शेख अशपाक शेख रशीद, शेख मुनाफ शेख रशीद, शेख साबीर (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सलीमनगर या तिघांनी जनावरांची चोरी करुन त्यांची कत्तल केली व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरकुटे करीत आहेत.
जनावरांची कत्तल करणाऱ्या तिघांना अटक
By admin | Updated: June 17, 2014 00:15 IST