शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील तीनही संच सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:48 IST

एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील संच तीनचा कोळसा हा धारीवालला फक्त आठ महिन्यांसाठी दिला असून, तो कायमस्वरूपी करार नाही. एकलहरेला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील असे आश्वासन महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांनी दिले.

एकलहरे : एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील संच तीनचा कोळसा हा धारीवालला फक्त आठ महिन्यांसाठी दिला असून, तो कायमस्वरूपी करार नाही. एकलहरेला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील असे आश्वासन महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांनी दिले. एकलहरे येथील तिसरा संच बंद केल्याबाबत खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे, पंचायत समिती सदस्य अनिल जगताप, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती चाफळकर यांनी मुंबई येथे महानिर्मितीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांची भेट घेऊन एकलहरे येथील तिसरा संच बंद करून तो कोळसा खासगी कंपनीकडे वळविल्याबद्दल निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती दिली. यावेळी ठेकेदार संघटनेचे निवृत्ती चाफळकर यांनी नाशिकला कोळशासाठी वॅगनला डॅमरेज व आॅइल कन्झमशन शून्य आहे. तीन-चार वर्षानंतर मेन्टेनन्स केला जात असल्याने ३.२७ रुपये खर्च येतो. मात्र दरवर्षी मेन्टेनन्स केल्यास तो खर्च २.६०पर्यंत येऊ शकतो असे स्पष्ट केले. गोडसे व घोलप यांनी राज्यात सातपैकी सहा ठिकाणी नवीन वीज प्रकल्प झालेत, मात्र नाशिकला झाला नाही. कोळसा वाहतूक, पाणी, जागा, इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ आदी सर्व बाबी नाशिकला अनुकूल आहेत. येथील संच चार असूनही वर्षभर अविरत चालू आहे. नवीन ६६०चा प्रकल्पासाठी सर्व बाबी अनुकूल असून, जोपर्यंत नवीन संच सुरू होत नाही तोपर्यंत जुने संच बंद करू नये, अशी मागणी केली. यावेळी शिष्टमंडळामध्ये दिलीप चव्हाण, संतोष जायगुडे, सदाशिव अत्तरदे, शांताराम राजोळे, शरद घुगे, सागर जाधव, योगेश म्हस्के आदी उपस्थित होते.तीनही संच सुरू राहतीलमहानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी यांनी फक्त आठ महिन्यांकरिता खासगी कंपनीशी करार झाला आहे. एकलहरे येथील संचांची दुरूस्ती व मेंटेनन्स करून आहे त्या परिस्थितीत तीनही संचांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जोपर्यंत एकलहरे वीजनिर्मितीला पर्यायी वीजनिर्मितीची व्यवस्था होईपर्यंत तेथील तीनही संच सुरू राहतील, असे श्रीमाळी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :electricityवीज