शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:25 IST

गोंदे दुमाला ते व्हीटीसी फाटा : अपघातांची मालिका सुरूच

ठळक मुद्दे अपघातातील अज्ञात वाहन पसार

नांदूरवैद्य : नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील विल्होळी ते मुंढेगाव दरम्यान अपघातांची मालिका सुरुच असून गोंदे दुमाला परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व्हिटीसी फाट्याजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या आयशरने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात एका अज्ञात वाहनाने गोंदे दुमाला येथील दोन तरुणांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२४) रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील व्हिटीसी फाटा येथे भरधाव वेगाने जात असतांना आयशर (क्रमांक एम.एच.१५, ए.जी.६८०९) या वाहनाने समोरून चाललेल्या मोटरसायकल (क्रमांक एम.एच.१५, ए.जे. १२०२) या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रोहन रतन मोकळ (वय ४८ रा.विखरने ता. येवला) ही व्यक्ती गंभीर झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या व्यक्तीस नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर गोंदे दुमाला परिसरात असलेल्या नाशिक -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने गोंदे दुमाला येथील मोटरसायकल (क्रमांक एम.एच. १५,जी.सी. ६७२०) या मोटरसायकला जोरदार कट मारून मोटरसायकल रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्यामुळे झालेल्या अपघातात गोंदे दुमाला येथील मोहन विठोबा नाठे (वय ३३, गोंदे दुमाला), मोहन भिकाजी नाठे (वय ६०, गोंदे दुमाला) हे दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील अज्ञात वाहन पसार झाले असून वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कर्मचारी करीत आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात