शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पादनासाठी त्रिसूत्रीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:30 IST

यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

ठळक मुद्देदादा भुसे : कृषिदिन, कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

नाशिक : यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे कोणे येथे आयोजित कृषिदिन आणि ‘कृषी संजीवनी सप्ताह’ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’ उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक गिरासे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना भुसे म्हणाले खरीप हंगामात कोणत्याही जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार नाही. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने एकदा अर्ज केला अन् त्यावर्षी त्याला लाभ मिळू शकला नाही तर पुढील वर्षी त्या शेतकºयास अर्ज करण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारची यंत्रणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना सर्वांचा पोशिंदा बळीराजाच होता. या प्रतिकूल परिस्थितीत अडचणींचा सामना करून शेतकºयांनी सर्वांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला पोहोचविला. १ ते ७ जुलै दरम्यान होणाºया सप्ताहात शेतकºयांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. भुसे यांच्या हस्ते विमल आचारे, दिनकर कडाळे, सीताबाई मुळाणे, वासंती कांबळे, भास्कर कांबळे, मधुसूदन भारस्कर, विश्वास चव्हाण या शेतकºयांचा सत्कार करण्यात आला.यांत्रिक पद्धतीने भातलागवडकार्यक्रमापूर्वी दादा भुसे यांनी बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. धोंडेगाव येथील कासुबेंडकुळे व त्यांच्या पत्नी चंद्रभागा बेंडकुळे यांच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या जोडप्याच्या रूपात साक्षात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.किशोर पवार या शेतकºयाच्या शेडनेडची पाहणी केली. हिरामण ठाकरे या शेतकºयाने उभारलेल्या शेततळे व फळबाग याची पाहणी त्यांनी केली. एकनाथ भोये यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. दादा भुसे यांनी स्वत: चिखलात उतरून मशीनची माहिती जाणून घेतली व भातलागवडदेखील केली.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीGovernmentसरकार