शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पिंगळवाडे येथील दुकान फोडणारे तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:39 IST

जायखेडा : वाटमारीचाही छडा लावण्यात यश

ठळक मुद्देनितेश चव्हाण हा २०१२ मध्ये माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या निवासस्थानी टाकलेल्या दरोड्यातील मुख्य सूत्रधार आहे.

सटाणा : तालुक्यातील पिंगळवाडे येथील दुकानफोडी व मांगीतुंगी रस्त्यावरील वाटमारीचा छडा लावण्यात जायखेडा पोलीस ठाण्याला यश आले असून तिघांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी वाटमारी करणाऱ्या चोरट्यांच्या घरावर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत सहा जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाटमारीतील तिघे मात्र फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.तालुक्यातील पिंगळवाडे येथील संजय महादू देवरे यांच्या कापड दुकानाचे शटर उघडून चोरट्यांनी विविध कंपन्याचे अंडरवेअर तसेच दहा हजार रु पयांची रोकड लुटून पोबारा केला होता.जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तपासाची चक्र शीघ्र गतीने फिरवली .पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर करंजाड येथे विहिरीवर काम करणारे मजूर असल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी विहिरीजवळ छापा टाकून राजेंद्र मामू कंजर ,पप्पू गुलाब कंजर ,महेंद्र मुकेश कंजर (तिघेही राहणार मोहपुरा, ता.बनेडा जि.भिलवाडा,राजस्थान ) यांना अटक करून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी तिघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.इन्फोमांडूळचे आमिष दाखवून लूटवरळी ,मुंबई येथील पत्रकार सुरेश मदनलाल शर्मा (३८ )मोहिनीश मोहन मयेकर ,दीपक सीना शेट्टी ,अजय भोजने यांचेशी तिघांनी तीन किलो वजनाचे मांडूळ विक्र ी करण्याबाबत मोबाईलवर चर्चा केली. त्यानंतर काही किंमतीत सौदा पक्का करण्यात येऊन मांगीतुंगी परिसरातील डोंगराजवळ मांडूळची डील करण्याचे ठरले.त्यानुसार गेल्या १६ डिसेंबरला रात्री दीड वाजेच्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी मांडूळ देण्याच्या नावाखाली चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चार महागड्या कंपनीचे मोबाइल ,एक तोळा सोन्याची चेन असा एकूण ८३ हजार रु पयांचा ऐवज लुटून नेला.याबाबत जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी मोबाइलवर आलेल्या कॉल्सची माहिती घेऊन चोरीचा छडा लावला. वाटमारीतील चोरटे धुळे जिल्ह्यातील जामदे येथील असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर जायखेडा पोलिसांनी फरार इकबाल जाकीर चव्हाण, सिर्वस अशोक पवार ,नितेश जहांगीर चव्हाण यांच्या जामदे येथील घरांवर छापा टाकण्यात आला.या छाप्यात लुटमारीतील दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले.यातील नितेश चव्हाण हा २०१२ मध्ये माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या निवासस्थानी टाकलेल्या दरोड्यातील मुख्य सूत्रधार आहे.याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी तिघांविरु द्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी