पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा-लासलगाव मार्गावर आंबेगाव सोमठाण देश शिवारात सोनवणे वस्तीजवळ बुधवारी (दि. ६) सायंकाळी ओव्हरटेकच्या नादात दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथील दांपत्य व पाटोदा येथील तरु णाचा समावेश आहे.बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोटरासायकलस्वार (क्र. एमएच ४१ एम २९११) चिंतामण वाल्मीक गांगुर्डे हे पत्नी सुनंदा गांगुर्डे यांच्यासह टाकळी लासलगावकडून घरी परतत असताना पाटोद्याकडून येणाऱ्या मोटारसायकलने (एमएच १५ जीके ८७८०) पीयूष रामदास वरे, ऋषिकेश भाऊसाहेब जोंधळे या तरुणांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक दिली. यात चिंतामण वाल्मीक गांगुर्डे व सुनंदा वाल्मीक गांगुर्डे हे दांपत्य जागीच ठार झाले तर जखमी झालेले पीयूष वरे हा शालेय विद्यार्थी रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाला. अपघातात जखमी झालेला ऋषिकेश जोंधळे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी जखमी युवकास रु ग्णालयात भरती करून मदत केली. याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस हवालदार मच्छिंद्र पठाडे, मुकेश निकम हे करीत आहेत.
मोटारसायकल अपघातात तीन ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:33 IST
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा-लासलगाव मार्गावर आंबेगाव सोमठाण देश शिवारात सोनवणे वस्तीजवळ बुधवारी (दि. ६) सायंकाळी ओव्हरटेकच्या नादात दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथील दांपत्य व पाटोदा येथील तरु णाचा समावेश आहे.
मोटारसायकल अपघातात तीन ठार, एक जखमी
ठळक मुद्देआंबेगाव शिवार : मृतांमध्ये नांदगावचे दांपत्य