शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

५गुजरातच्या भाविकांची  बस दरीत कोसळून तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:59 IST

त्र्यंबकेश्वर/नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुजरातमधील भाविक महालक्ष्मी देवी चारोटी नाक्याकडे जात असताना पालघर ...

त्र्यंबकेश्वर/नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुजरातमधील भाविक महालक्ष्मी देवी चारोटी नाक्याकडे जात असताना पालघर जिल्ह्यातील तोरंगण घाटात अतितीव्र उतारावर खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस ८० फूट खाली दरीत कोसळली. त्यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांची नावे समजलेली नाहीत. ३८ प्रवासी जखमी झाले आहेत.मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.२४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तोरंगण घाटातून डहाणू येथील महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होत असलेल्या गुजरात राज्याच्या (जीजे १७, यूयू ११४८) या खासगी बसला अपघात झाला. बस घाट ओलांडून पुढे आली असता तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटला  आणि बस थेट दरीत कोसळली. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. मयतांमध्ये दोन महिला, एका पुरुषाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ शासनाच्या (टोल फ्री १०८ मदतवाहिनी) आठ ते दहा रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामधून जखमींना त्र्यंबकेश्वर, मोखाडा, नाशिकच्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ हलविले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार गंभीर रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे.सुटीवरील डॉक्टरांना पाचारणरविवारची सुटी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय मनुष्यबळ कमी होते; मात्र अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सुटीवरील डॉक्टरांना तत्काळ हजर होण्यास सांगितले. अस्थिरोग तज्ज्ञांसह अन्य आठ ते दहा डॉक्टरांचे पथक व परिचारिकांचा चमू सज्ज ठेवण्यात आला. रुग्णालयात रुग्णवाहिकांमधून दाखल रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता दोन स्ट्रेचर अपुरे पडले. यावेळी काही रुग्णांना अन्य रुग्णांच्या नातेवाइकांनी मदत करत दाखल केले. अत्यल्प स्ट्रेचर होते. यामुळे रुग्णांचे हाल झाले. आपत्कालीन परिस्थिती ‘बॅकअप’ देणारा अन्य मनुष्यबळही सज्ज ठेवणे गरजेचे होते, असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू