नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत युवा मित्र व ग्रामस्थांच्या श्रमदानातून झालेल्या कामामुळे परिसरात साठणार तीन कोटी लिटर पाणीसाठा मिळणार आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत देशवंडी गावचा समावेश झाल्याने गावच्या ३६५ हेक्टर क्षेत्रावर युवा मित्र व ग्रामस्थांच्या सहभागातुन परिसरात मोठया प्रमाणात पाणी आडवा पाणी जिरवा उपक्र म राबविण्यात येत आहे.यामध्ये सीसीटी,चर,नाले ,बांधारे,खोलीकरण आदी कामांबरोबर शेततळे उभारले जात आहे. येथिल माळरानावर श्रमदानातुन झालेल्या कामामध्ये मोठया प्रमाणात सीसीटी व चर पाडुन आत्ता पर्यंत पाणी आडवा पाणी जिरवा चे मोठे काम झाले आहे.झालेल्या कामाने देशवंडीच्या माळरानावर येणार्या पिहल्या पावसातच सुमारे 3 कोटी पाणी आडून जमिनीत जिरणार असल्यामुळे शेकडो हेक्टर जमिन ओलिताखाली येण्याचा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहे. ग्रामस्थ ,युवा मित्र व देणगीदार यांच्या उपस्थितीत झालेल्या मार्गदर्शन शिबिरात नाशिक येथिल प्राध्यापक अशोक सोणवने,डाँ.भाऊसाहेब मोरे,मुकूंद पाटील,युवा मित्रचे सुनिल पोटे सरपंच वणतिा कापडी,कोतवाल संघटनेचे प्रविण कर्डक आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी उपसरपंच सुभाष बर्के,ग्रामसेवक लिलके,गोदा युनियनचे रमेश डोमाडे,शालेय समतिीचे अध्यक्ष दत्तारम डोमाडे,मुरलिधर बर्के,संजय कर्डक,संदीप कापडी,केशव कापडी,अंबादास कापडी,देविकसन बर्के,वाल्मिक कापडी व जे.एम.ग्रूपचे सदस्य उपस्थित होते. देशवंडी येथे जलयुक्त शिवार योजनेद्वारे सुरू असलेल्या जलसंधारणच्या पुढील कामांसाठी मशनरींना लागेल तेवढ्या डिझलची मदत देण्याचे माळेगाव येथिल विजय कारखान्याचे मालक मुकूंद पाटील यांनी आश्वासन दिले तर उर्वरीत कामांसाठी मशनरी पुरविणार असल्याचे आश्वासन युवा मित्रचे सुनिल पोटे यांनी आश्वासन दिले आहे.
श्रमदानामुळे साठणार तीन कोटी लिटर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 14:59 IST