शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

रेल्वेने तीन लाख भाविक दाखल; दोन लाख परतलेही

By admin | Updated: September 13, 2015 22:27 IST

रेल्वेने तीन लाख भाविक दाखल; दोन लाख परतलेही

नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीचे शाहीस्नान आटोपल्यानंतर रेल्वे व रस्तामार्गे जवळपास दोन लाखांहून अधिक भाविक पुन्हा रवाना झाले. तर सुमारे तीन लाख भाविक रेल्वेमार्गे नाशिकमध्ये दाखल झाले होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकांवर शनिवारी मध्यरात्रीपासून रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर दाखल झालेले भाविक हे पहाटे अडीच-तीनच्या सुमारास सिन्नर बाजूकडून बाहेर पडले. हजारो भाविक स्नानासाठी निघाल्याने एसटी बसेस, रिक्षा कमी पडल्या होत्या. यामुळे काही भाविक पायी-पायी रामघाट व तपोवनच्या दिशेने निघाले होते. भाविकांची झालेली गर्दी बघता पोलीस प्रशासनाने तत्काळ जादा बसेस एसटी महामंडळाकडून पाचारण केल्याने भाविकांची झालेली अडचण दूर झाली. पहाटे स्नान झाल्यानंतर भाविक पुन्हा परतीच्या मार्गाला निघाले होते. सकाळी १०-११ वाजेनंतर परतीच्या मार्गावरील भाविकांचा ओघ वाढला होता, तर दुपारनंतर एसटी बसेस, रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनांमध्ये अक्षरश: प्रचंड दाटीवाटीत भाविक रेल्वेस्थानकावर दाखल होत हाते. पुणे बाजूकडून रस्ता मार्गे खासगी वाहनाने आलेले भाविकदेखील फार मोठ्या संख्येने परतीच्या मार्गावर होते. चिंचोली नाका बाह्य बसस्थानक, सिन्नरफाटा बसस्थानक व सिन्नरफाटा येथील त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी असलेले बसस्थानक येथून भाविकांना घेऊन गेलेल्या बसेस सकाळी ११ वाजेपासून पुन्हा भाविकांना घेऊन येत होत्या. दुपारनंतर काठेगल्ली व मुंबई नाका महामार्ग बसस्थानक येथे परतीच्या प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने नाशिकरोड भागातून जादा रिकाम्या बसेस भाविकांना घेण्यासाठी पाठविल्या होत्या. बिटको चौकातून रिक्षाचालकांना रेल्वेस्थानकाच्या दिशेने सोडण्यास पोलिसांनी नियोजनामुळे मज्जाव केला होता. (प्रतिनिधी)

रेल्वे, बसस्थानकांवर तोबा गर्दीदुपारनंतर परतीच्या भाविकांची रेल्वे मालधक्का, स्थानक व चिंचोली नाका बाह्य बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. मालधक्का आवारात सायंकाळी १५ ते २0 हजार भाविक रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकळून पडले होते. मालधक्क्यावरून भाविक रेल्वेस्थानकात जाऊ देण्यासाठी मोठा गोंधळ करत असल्याने रेल्वे पोलिसांवरील कामाचा ताण व टेन्शन खूप वाढले होते. चेंगराचेंगरी व काही गडबळ गोंधळ होऊ नये म्हणून भाविकांना ध्वनीक्षेपकांवरून सतत सूचना करण्यात येत होत्या.रेल्वे मार्गे परतीचे प्रवासी देवळालीगाव मालधक्का येथून रेल्वेस्थानकांवर सोडण्यात येत होते. रिक्षाचालकांनी भाविकांना देवळालीगाव राजवाडा येथे न सोडता बिटको चौक व महात्मा गांधी रोडवर मध्येच सोडून दिल्याने भाविकांना चांगलीच पायपीट करण्याची वेळ आली होती. तर रेल्वेच्या परतीच्या भाविकांना सत्कार पॉईंट देवळालीगावपर्यंत एसटी बसने सोडण्याचे नियोजन होते. मात्र परतीचे एसटीचे नियोजन फसल्याने भाविकांना पायपीट करत मोठा त्रास सहन करावा लागला.