शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भस्माच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:01 IST

मानसोपचार तज्ज्ञाचे उपचार सुरू असलेल्या मुलीला बरे करण्याचे आमिष दाखवून, चमत्कारी भस्माचा हवाला देऊन व वेळोवेळी होम करण्यास भाग पाडून तीन लाखांपेक्षाही अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी चारजण पोलिसांच्या जाळ्याात सापडले. मोटार सायकलच्या नंबरवरून नांदगाव पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. दरम्यान लुबाडलेल्या रकमेपैकी दीड लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देचौघांना अटक : दीड लाख रुपये परत मिळविण्यात यश

नांदगाव : मानसोपचार तज्ज्ञाचे उपचार सुरू असलेल्या मुलीला बरे करण्याचे आमिष दाखवून, चमत्कारी भस्माचा हवाला देऊन व वेळोवेळी होम करण्यास भाग पाडून तीन लाखांपेक्षाही अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी चारजण पोलिसांच्या जाळ्याात सापडले. मोटार सायकलच्या नंबरवरून नांदगाव पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. दरम्यान लुबाडलेल्या रकमेपैकी दीड लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.रवींद्र साळुंके ऊर्फ स्वप्नील महाराज (२५) व संजय सुपेकर ऊर्फ रामचंद्र महाराज (२९) दोघे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव, व अंकित मोरे तथा रवींद्र वाघाडकर (२२) व दिलीप पोते (३२) अशी पोलिसांनी पकडलेल्या चौघांची नावे आहेत.नांदगाव शहराजवळ पाटखाना भागात मुकुंद पाटील व त्यांची बहीण वैशाली राहतात. जानेवारी महिन्यात एके दिवशी दुपारी १ वाजता गोशाळेला दान मिळविण्याच्या निमित्ताने फिरत फिरत घरी आलेल्या वरील चार जणांनी गोड बोलून व आपणाकडे दैवी चमत्काराची उपचार पद्धती असल्याचा दावा करून पाटील कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. कथित भस्माचे द्रावण (ज्याच्यात फक्त मध व जिलेबीचा रंग) देऊन पूर्ण बरे करण्याचा दावाही त्यांनी केला. मानसोपचार तज्ज्ञापेक्षा हा बरे होण्याचा झटपट मार्ग पाटील याना चांगला वाटल्याने ते या चौघांच्या बरे करण्याच्या दाव्यांवर भाळले आणि तेथूनच पैसे उकळण्याचा सिलसिला सुरू झाला. आधी ६००० रुपये कोपरगावला नंतर २३ हजार रुपये घेतले गेला. तरीही गुण येत नाही म्हणून नांदगावला पाटखाना येथील घरी ३५ हजार रुपयांचा होम... ५५ हजारांचा उपचार विधी... पुन: पाच हजारांचे अद्भुत भस्म... मध्ये मध्ये काही रकमा... आणि शेवटी १ लाख रुपयांचा कायापालट भस्म विधीचा जालीम उपाय अशी बनवाबनवी सुरू होती. कायापालटाचे १ लाख रु पये मिळण्यापूर्वी हे केले नाही तर आधीचे विधी वाया जातील अशी भीती घालण्यात आली. ३ लाखांपेक्षा अधिक रक्कम घालवल्यानंतर मुकुंद पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेतली.केवळ दुचाकी क्रमांकाचा धागाया घटनाक्र मात तपास करताना पोलिसांकडे फक्त दुचाकी (क्र. एमएच १७ बीई ८३४६) एवढा एकच धागा होता. त्यावरून त्यांनी माग काढला. पाटील यांनी जून २०१८ मध्ये याबाबत फिर्याद दिली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक