शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रासेगाव अपघातातील मृतांची संख्या तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:12 IST

पेठ : गुजरात महामार्गावरील रासेगाव नजीक झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली असून, रत्ना गोकुळ भदाणे यांचे उपचार सुरू असताना मध्यरात्री निधन झाले.

ठळक मुद्देदुर्दैवी। उपचारादरम्यान शिक्षिकेचे निधन

पेठ : गुजरात महामार्गावरील रासेगाव नजीक झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली असून, रत्ना गोकुळ भदाणे यांचे उपचार सुरू असताना मध्यरात्री निधन झाले.शुक्र वारी सायंकाळी ट्रक व प्रवासी जीप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीन प्रवासी ठार झाले असून, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मध्यरात्री निधन झालेल्या रत्ना भदाणे या उंबरपाडा (सु.) येथील शारदा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. गत १५ वर्षांपासून त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या शाळेत सेवा केली. मागील वर्षी शाळेला २० टक्के अनुदान प्राप्त झाले होते. आतातरी वेतन मिळेल आणि संसाराचा गाडा सुरळीत चालेल या आशेवर असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. जीपचालक बाळू शंकर गांगुर्डे हे २० वर्षांपासून नाशिक-पेठ रस्त्यावर जीप चालवित होते. वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून त्यांनी आपला संसार उभा केला होता. रात्री अपरात्री क्षणाचाही विलंब न लावता कोणाच्याही मदतीला धाऊन जाणाºया बाळू गांगुर्डे यांच्या निधनाने संपूर्ण पेठ शहरावर शोककळा पसरली.२कल्पेश बोरसे हा सेवानिवृत्त तलाठी दत्तात्रय बोरसे यांचा मुलगा होता.या अपघातामुळे नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दिरंगाईचा प्रश्न समोर आला असून, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या पुलाचे काम धिम्या गतीने सुरू होते. त्यात साइडपट्टी नसल्याने व एकेरी वाहतूक सुरू असल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. पेठ, दिंडोरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.