सलग दुसऱ्या दिवशी आढळले तीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:13 PM2020-05-27T22:13:02+5:302020-05-27T23:56:11+5:30

सिन्नर : तालुक्यात मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस प्रत्येकी ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दोन दिवसात ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या २0 झाली असून तालुका धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे.

Three infected found for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी आढळले तीन बाधित

सलग दुसऱ्या दिवशी आढळले तीन बाधित

Next

सिन्नर : तालुक्यात मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस प्रत्येकी ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दोन दिवसात ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या २0 झाली असून तालुका धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे.
मुंबई येथून येणाºया प्रवाशांमुळे तालुक्यातील स्थिती धोकादायक ठरू पाहात आहे. मंगळवारी सायंकाळी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. बुधवारी दुपारी पुन्हा ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या २0 झाली आहे.
तालुक्यातील देशवंडी येथे तीन दिवसांपूर्वी वीस वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर तिच्या संपर्कातील ११ कुटुंबीयांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी रात्री २५ वर्षीय युवक, ४0 वर्षीय युवक आणि ७३ वर्षीय वृद्ध यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशवंडी गाव यापूर्वीच कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून आरोग्य विभागाच्या तीन पथकाद्वारे नागरिकांची दररोज तपासणी करण्यात येत आहे. सलग दोन दिवस सिन्नर तालुक्यात ३ पॉझिटिव्ह आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे.
बुधवारी दुपारी देशवंडी येथील १६ वर्षीय मुलगा, फुलेनगर (वावीजवळील) ५४ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. हे दोघेही मुंबई येथून आलेले आहेत. तर निमगाव-सिन्नर येथील २६ वर्षीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला असून तो दिल्ली येथून आला आहे.
दरम्यान, सिन्नर तालुक्यात मुंबई येथून येणारे नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने मुंबई प्रवासाची हिस्ट्री असणाºया नागरिकांची चिंता वाढली आहे. सिन्नर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २0 झाली आहे. रुग्ण आढळल्यानंतर तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्यासह पोलीस अधिकारी व आरोग्य कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन कंटेन्मेंट परिसर सील करण्यासह संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहेत.
----------------------------------------
देशवंडी येथे एकाच कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे मुंबई येथून आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. तीन दिवसांपूर्वी या कुटुंबातील वीस वर्षे युवतीला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या कुटुंबातील ११ जणांना तपासणीसाठी सिन्नरला दाखल केले होते, यातील आणखी चार पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशवंडी येथील एकाच कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
---------------------
मुंबईकरांनी धोका वाढवला
सिन्नर तालुक्यातील हजारो लोक मुंबई येथे नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झाले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर झाल्यानंतर अनेक जण परवानगी किंवा विना परवानगीने सिन्नरच्या ग्रामीण भागात येऊन राहत आहे. यामुळे सिन्नरच्या ग्रामीण भागाला धोका वाढला आहे. सिन्नर तालुक्यात आजपर्यंत २0 रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी बहुतांश रुग्णांना मुंबई हिस्ट्री आहे. मुंबईकरांनी सिन्नरकरांना धोका वाढवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

Web Title: Three infected found for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक