शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:09 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : पंधरा दिवसांपूर्वी श्वान व अकरा पिल्ले फस्त

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.10) घडली असून येथील शेतवस्तीवरील शेतकरी भयभीत झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या बिबट्याने हल्ला चढवत जवळच असलेल्या कैलास कर्पे यांनी पाळलेल्या कुञ्यावर झडप घालत फस्त केले असून येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून वस्तीस राहणा-या शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील कर्पे तसेच सायखेडे मळ्यामध्ये याआधी देखील गायी, बैल आदींवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून काही दिवसांपूर्वीच एक बिबट्या येथील शेतकरी कैलास कर्पे यांच्या निदर्शनास आला होता. या परिसरात शेती जास्त असल्यामुळे जंगलवाढ झालेली असून बिबट्याचा या परिसरात भक्ष शोधण्यासाठी नेहमी वावर असतो. याच पाशर््वभूमीवर रविवारी बिबट्याने सायखेडे यांच्या शेतवस्तीवरील घराजवळील गोठ्यात असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवला असता जवळच असलेले कुञे भुंकायला लागल्यावर तसेच इतर शेतकर्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात माञ वासरू जखमी झाले आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी याच वस्तीवर असलेल्या कर्पे यांच्या एका श्वानावर हल्ला चढवत ठार केले होते. तसेच जवळच असलेल्या शेतकर्यांनी देखील अनेकवेळा बिबट्या पाहिला असल्याचे सांगितले असून पुन्हा या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असून या शेतवस्तीवर दोन पोल्ट्रीफार्म असल्याने तसेच येथील शेतकर्यांना दुग्धव्यवसायासाठी गावात जावे लागत असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून या शेतवस्तीवर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दत्तु काजळे, नवनाथ कर्पे, नामदेव यंदे, मुकुंदा यंदे, रोहिदास सायखेडे, ज्ञानेश्वर कर्पे, सोपान कर्पे, लहानू सायखेडे, संतू सायखेडे, गोकुळ सायखेडे, आदी. शेतकर्यांनी केली आहे. या झालेल्या हल्ल्यामुळे येथील शेतवस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली असून शेतकरी धास्तावले आहेत. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतवस्तीवरील शेतकरी करीत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीforestजंगल