वडनेर : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे आग लागल्याने तीन झोपड्या जळून खाक झाल्यामुळे तीनही कुटुंब उघड्यावर आली आहेत. शुक्रवारी ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी झोपड्यांना लागलेली आग विझविली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मच्छिंद्र सुरसिंग पवार, जालिंदर सुरसिंग पवार व सुशीला वामन वाघ या तिघांचे संसारोपयोगी साहित्य जळाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तीनही झोपड्या जवळजवळ असल्याने आग पसरत गेली. घटनास्थळी सुशीला वाघ उपस्थित होत्या, तर जालिंदर पवार व मच्छिंद्र पवार हे ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते.
अजंगला आग लागून तीन झोपड्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:01 IST