शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

नाशिकच्या बांधकाम खात्यातूनच सव्वा तीनशे मोजमाप पुस्तिका गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 14:59 IST

नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गंत येणा-या पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पुर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणा-या मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखरेख ठेवणा-या संबंधित अधिका-यांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देसव्वा तीनशे कामाचे देयके रखडले : अधिका-यांचे कानावर हात सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामे टक्केवारीने चालतात हे आजवर लपून राहिलेले नाही

नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पुर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षापासून सापडत नसल्याने जवळपास सव्वा तीनशे कामांचे देयके रखडले असून, या पुस्तिकांचा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून शोध घेतला जाऊन त्यासाठी संबंधित कामांवर नियंत्रण ठेवणा-या अधिका-यांवर जबाबदारी निश्चित केली जात असली तरी, काम पुर्ण झाल्यानंतर देयक काढण्यासाठी बांधकाम खात्याकडून जी पद्धत अवलंबीली जाते ते पाहता, सात ते आठ टेबलवरून मोजमाप पुस्तिका फिरत असल्याने सदरच्या पुस्तिका बांधकाम खात्यातच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गंत येणा-या पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पुर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणा-या मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखरेख ठेवणा-या संबंधित अधिका-यांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता, उप अभियंत्यांना पत्रे पाठवून वारंवार कामांच्या मोजमाप पुस्तिकांची मागणी केली आहे. परंतु त्याला अधिकारी दाद देत नसल्याचे पाहून वृत्तपत्रातून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून कार्यकारी अभियंत्यांनी सुमारे ७२ अभियंत्यांच्या नावे व त्यांच्याकडे प्रलंबीत असलेल्या मोजमाप पुस्तिकांचे क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. दहा दिवसात सदरच्या पुस्तिका जमा न केल्यास संबंधित कामांचे देयके अदा न करण्याची तसेच त्या पुस्तिका गायब झाल्याची पोलीसात तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडला असल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, मुळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामे टक्केवारीने चालतात हे आजवर लपून राहिलेले नाही, त्यामुळे काम झटपट पुर्ण करण्याकडे जसा ठेकेदाराचा कल असतो, तसाच त्या कामाचे नियंत्रण करणा-या अधिका-यालाही काम हातावेगळे करण्याची घाई झालेली असते. मुळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम करणारे ठेकेदारच अधिका-यांऐवजी मोजमाप पुस्तिका हाताळत असतात व तेच या पुस्तिकेच्या आधारे कामाचे देयक तयार करीत असतात, अधिका-याची स्वाक्षरी घेतल्यानंतर देयकासाठी मोजमाप पुस्तिका सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्यालयात सादर केली जाते. काम केलेले असल्यामुळे ठेकेदाराला बिलासाठी घाई असल्याने तो कोणत्याही परिस्थितीत मोजमाप पुस्तिका स्वत: जवळ ठेऊ शकत नाही, तर अधिका-यांचाही त्यात ‘रस’ असल्याने त्यांच्याकडूनही विलंब होण्याची शक्यता नसते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयNashikनाशिक