शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात होणार तीनशे किलोमीटरचे रस्ते, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हजार कोटींची गरज

By suyog.joshi | Updated: September 23, 2023 16:20 IST

सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाने प्राथमिक आराखडे तयार केले असून, विकासकामांचा हा आकडा एकूण आकडा आठ ते दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे.

नाशिक : दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा नाशिक शहराच्या विकासासाठी पर्वणी ठरतो. सन २०२७-२०२८ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महपालिकेच्या बांधकाम विभागाने जोरदार तयारी सुरू केली असून, शहरात तीनशे किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जुने रिंगरोडची रुंदी वाढविणे, अस्तरीकरण व शक्य तेथे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाने प्राथमिक आराखडे तयार केले असून, विकासकामांचा हा आकडा एकूण आकडा आठ ते दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यात एकट्या बांधकाम विभागाचा खर्च तीन ते चार हजार कोटींच्या घरात आहे. त्यात प्रामुख्याने इनर व मीडल रिंगरोडसह मिसिंग लिंकवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गत सिंहस्थात शहरात ७२ किलोमीटरचे रस्ते उभारण्यात आले होते. यंदा ते धरून एकूण तीनशे किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. त्यात १९० किलोमीटरचे इनर रिंगरोडचा समावेश आहे.

मागील सिंहस्थात पंधरा मीटरचे रिंगरोड उभारण्यात आले होते. त्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काहींची मागील बारा वर्षांपासून डागडुजीही झाली नाही. अशा १५ मीटरच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून ते तीस मीटरचे केले जातील. त्यासाठी भूसंपादनाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, त्यावर तोडगा काढताना बांधकाम विभागाची कसोटी लागणार आहे. नवीन रिंगरोडसाठीही भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी किती क्षेत्र बाधित होईल, किती मोबदला द्यावा लागू शकतो यावर प्राथमिक स्तरावर काम सुरू आहे. तसेच इनर व मीडल रिंगरोडमधील मिसिंग दूर केल्या जातील. सिंहस्थात लाखो भाविक शहरात येणार असून, वाहतूक कोंडी मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे बांधकाम विभागाने शहरात रस्त्याचे जाळे विणण्यास प्राधान्य देणार असून, जेणेकरून कुंभमेळा कालावधीत एका ठिकाणाहून दुसरीकडे ये-जा करण्यासाठी मुख्य शहरातून जाणे टाळत इनर रिंगरोडचा वापर करून कोंडी टाळणे शक्य होईल.मागील सिंहस्थात ७२ किलोमीटरचे इनर रिंगरोड तयार करण्यात आले होते. यंदाच्या सिंहस्थात तीनशे किमीचे जाळे विस्तारले जाईल. तसेच जुन्या रिंगरोडचे रुंदीकरण केले जाईल. त्यासाठी किती भूसंपादन गरजेचे आहे, त्यावर काम सुरू आहे.- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा

टॅग्स :Nashikनाशिक