शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून वाडीचे रान वर तीन शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:45 IST

पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली.

ठळक मुद्देरहिशांमध्ये भीती व्यक्त होत आहेसुदैवाने दुर्घटना टळली

नाशिक : वालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली. पहाटेच्या सुमारास डेमसे हे गोठ्यात गेले असता त्यांना तीन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दातांच्या खुणा असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाशी संपर्क साधत वनअधिकाऱ्यांना माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला असता बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे पुढे आले. वालदेवी नदीच्या काठाने बिबट्याचा सतत वावर असून, या भागातील मळे परिसरात बिबट्याचा शिरकाव होऊ लागल्याने रहिशांमध्ये भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने या परिसरात योग्य ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच बिबट्याचा वाढता वावर नदीकाठामुळे असून तहान, भूक भागविण्यासाठी बिबटे रात्री संचार करतात, त्यामुळे नागरिकांनी आपले पशुधन सुरक्षितरीत्या ठेवत गोठे बंदिस्त करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी अंगणात झोपणे मळे परिसरातील शेतकºयांनी टाळावे, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकेल.--सुदैवाने दुर्घटना टळलीरात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी डेमसे कुटुंबीय आपल्या लहान मुलांसह अंगणात रात्री झोपलेले होते. यावेळी बिबट्याने एका झाडावरून थेट त्यांच्या गोठ्याच्या पत्र्यावर उडी घेतली. यावेळी बिबट्याने अंगणात झोपलेल्या कुटुंबीयांकडे मोर्चा वळविला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. गोठ्यात बिबट्याला शेळ्यांच्या रूपाने सहजरीत्या खाद्य मिळाल्याने त्याने गोठ्यातून भूक भागवून पळ काढला.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकwildlifeवन्यजीव