शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रात्रीत फोडले तीन फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:54 IST

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तारवालानगर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तारवालानगर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, मागील दहा दिवसांमध्ये चोरट्यांनी विविध भागांमध्ये तब्बल वीस घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटला आहे. पंचवटीत मंगळवारी पहाटे तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याने तारवालानगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तारवालानगरमधील रोही अपार्टमेंटमधील रहिवासी अंबादास अशोक बोडके यांच्या सदनिकेत प्रवेश करून चोरट्याने सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लुटून जबरी चोरी केली आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रकमेचा समावेश आहे. तसेच शिवशक्ती संकुलामधील १३ क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे अनिल महादू सानप यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ४३ हजारांचा ऐवज तर प्रकाश खंडेराव आव्हाड यांच्या घरातून २० हजार रुपये असा एकूण ६३ हजारांचा ऐवज लुटला. या तीन घटनांमध्ये तब्बल २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी