शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तिघा महिला प्रवाशांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:09 IST

सीबीएसवरून सिन्नरला बसमधून जाणाऱ्या दोघा महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले. दरम्यान, नाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

नाशिकरोड : सीबीएसवरून सिन्नरला बसमधून जाणाऱ्या दोघा महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले. दरम्यान, नाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.हिवरे येथील आशा रूपवते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांच्या पती समवेत जुने सीबीएस येथून सिन्नरला जाण्यासाठी बसमध्ये बसले. नाशिकरोड बिटको चौक सिग्नल येथे बस आली असता रूपवते यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतमधील एक सोन्याचा मणी त्यांच्या अंगावर पडला. रूपवते यांनी गळ्याला हात लावून बघितले असता त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोत तुटलेली आढळली. त्याचप्रमाणे घोडेकर यांच्या गळ्यातीलदेखील मंगळसूत्र तुटलेले आढळले. सीबीएस ते बिटकोदरम्यान अज्ञात चोरट्याने दोन्ही महिला प्रवाशांचे मंगळसूत्र गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी चोरून नेले.नाशिकरोड बसस्थानकात गेल्या काही दिवसांत महिलांच्या पर्समधून मौल्यवान वस्तू, रोकड, पुरुषांचे पाकीट, मोबाइल आदी चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या ठिकाणी पोलीस चौकी असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नसून पाकिटमार चोरांनी उच्छाद मांडला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाकिटमार चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त झालेल्या प्रवाशांनी केली आहे. दरम्यान पंचवटी, सिडको सातपूर परिसरात चोºयांच्या घटनांत वाढ झाली आहे.पर्समधून दागिन्यांची चोरीनाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. संगमनेर येथील वयोवृद्ध सुनीता सुधाकर शंखपाळ या नाशिकरोड येथे आपल्या नातेवाइकांकडे आल्या होत्या. शंखपाळ या मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकातून संगमनेरला जाण्यासाठी नाशिक-शेगाव संगमनेरमार्गे जाणाºया बसमध्ये बसल्या. शिंदेगावपर्यंत बस गेल्यानंतर शंखपाळ यांना आपल्या पर्सची चैन अर्धवट उघडी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पर्स तपासली असता छोट्या काळ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची ठुशी, दोन हजार रुपये रोख असा ४० हजार रुपयांचा ऐवज व आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅँकेचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी