धोकादायक : बाहेरगावच्या रुग्णांची संख्या जास्तनाशिक : शहर व जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, गेल्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूमुळे तिघांचा बळी गेला आहे. आतापर्यंत १८ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची नोंद असून, त्यात बाहेरगावहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत देण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या कथडा रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे.महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सन २०१४ मध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दरवर्षी स्वाइन फ्लूची लागण झालेले रुग्ण शहरात उपचारासाठी विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत दाखल होत असतात. यंदा वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत शहरात अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तीन रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी एक रुग्ण पखालरोड परिसरातील आहे. नामपूर येथील मधुकर बच्छाव या रुग्णाचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मार्च महिन्यात गेल्या १५ दिवसांत मात्र १४ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील ११ रुग्ण हे बाहेरगावचे आहेत. त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील कांचन हजारे आणि सटाणा
जिल्ह्यात दीड महिन्यात स्वाइन फ्लूचे तीन बळी
By admin | Updated: March 15, 2017 23:51 IST