शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिन्नरजवळ कार उलटून नाशिकरोडचे तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:37 IST

नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर धडकून उलटल्याने नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. कारचा वेग इतका भयानक होता की कार दुभाजकावर धडकल्यानंतर हवेत फेकली गेली. त्यानंतर ती सुमारे २०० फूट लांब शेतात जाऊन पडली.

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर धडकून उलटल्याने नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. कारचा वेग इतका भयानक होता की कार दुभाजकावर धडकल्यानंतर हवेत फेकली गेली. त्यानंतर ती सुमारे २०० फूट लांब शेतात जाऊन पडली. कारमधील नाशिकरोड येथील आमेसर कुटुंबातील मायलेक व चुलती जागीच ठार झाली. सिन्नर बायपासवर गुरेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा भयानक अपघात झाला.  जेलरोड, नाशिकरोड येथे जितू राम आमेसर (३०) बेकरी व्यवसाय करतात. त्यांची आई सीमा राम आमेसर (५०) या नागपूर येथे राहतात. त्या मुलगा जितू यांच्याकडे आल्या होत्या. शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी चुलती वर्षा जगदीश आमेसर (४९) हे तिघे टाटा मांझा कार (क्र. एम. एच. ०४ ई. एक्स. ८६३२) घेऊन निघाले होते. नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे आल्यानंतर सिन्नर शहरातून जाण्याऐवजी ते रस्ता चुकून बायपासने संगमनेरच्या दिशेने गेले. पुढे दोन-तीन किलोमीटर गेल्यानंतर गुरेवाडी फाट्याजवळ चौफुलीजवळ चालक जितू आमेसर यांना वळणाचा अंदाज आला नाही. चौफुलीवर असलेल्या दुभाजकावर भरधाव वेगाने जाणारी कार धडकली. कारला प्रचंड वेग असल्याने ती हवेत उंच व लांब फेकली गेली. रस्त्याच्या कडेला लोखंडी बोर्डला तोडून कार शेतात २०० ते ३०० फूट लांब फेकली गेली. कार हवेत असतांनाच त्यातील तिघेही बाहेर फेकले गेले. कारने हवेत गिरक्या घेत शेतात पडल्यानंतर दोन-तीन वेळा उलटली गेली. तिघेही कारपासून सुमारे १०० ते २०० फूट लांब फेकले गेले. कारचा चक्काचूर झाला. त्यानंतर इंजिनने पेट घेतला.  या भयानक अपघातात जितू राम आमेसर (३०) रा. पेंढारकर कॉलनी, पंचरत्न सोसायटी, नाशिकरोड, त्यांची आई सीमा आमेसर (५०) रा. नागपूर हल्ली नाशिकरोड व वर्षा जगदीश आमेसर (४९) रा. आनंद प्लाझा सोसायटी, प्रेसच्या भिंतीलगत, जेलरोड, नाशिकरोड हे जागीच ठार झाले. घटनास्थळी वाहनचालक व बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोतीलाल वसावे, हवालदार टी. के. कदम, तुषार मरसाळे, सुनील ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात