शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन उमेदवारांच्या प्रकाशकांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:04 IST

प्रचारपत्रकावर प्रकाशक आणि मुद्रकाचा पत्ता प्रसिद्ध न केल्याने नाशिक पश्चिममधील भाजप, कॉँग्रेस आणि मनसे उमेदवारांच्या प्रकाशकांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : प्रचारपत्रकावर प्रकाशक आणि मुद्रकाचा पत्ता प्रसिद्ध न केल्याने नाशिक पश्चिममधील भाजप, कॉँग्रेस आणि मनसे उमेदवारांच्या प्रकाशकांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.नाशिक मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, कॉँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तीनही उमेदवारांच्या विरोधात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सातपूर, गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. देवयानी फरांदे यांच्या जाहिरात पत्रकावर संबंधित प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे आहेत. मात्र त्यांचे पत्ते नमूद नसल्याने प्रकाश प्रशांत जाधव, पवन भगूरकर, नाना शिलेदार, सुरेश मानकर, सुनील देसाई, श्याम बोरदे, राम काळे, देवदत्त शिंदे, उदयरत्न पारखी, वसंत उशीर, अविनाश पाटील, रोहिणी नायडू, भारती बागुल, पुष्पा शर्मा, सुजाता करजगीकर, अजिंक्य साने यांच्यावर सातपूरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेमलता पाटील यांच्या जाहिरात पत्रकातदेखील मुद्रकाचे नाव व पत्ता तसेच प्रकाशकाचा पत्ता नमूद न केल्याने प्रकाशक शरद अहेर, रंजन ठाकरे यांच्याविरुद्ध तर नितीन भोसले यांच्या जाहिरात पत्रकावरही पत्ता नसल्याने प्रकाशक डॉ. प्रदीप पवार, अनंत सूर्यवंशी, अंकुश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Crime Newsगुन्हेगारी