शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तीन पुलांचे आॅडिट तीन वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:54 IST

नाशिक : ब्रिटिशांनी बांधलेल्या त्यावेळेच्या व्हिक्टोरिया आणि आताच्या होळकर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश ...

ठळक मुद्देस्मार्ट नाशिकचा कारभार : जानेवारीत कार्यारंभ आदेश देऊन होईना काम

नाशिक : ब्रिटिशांनी बांधलेल्या त्यावेळेच्या व्हिक्टोरिया आणि आताच्या होळकर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश कंपनीने आयुर्मान संपले, असे महापालिकेला कळवून आता वीस वर्षे झाली. परंतु सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर जवळपास तीन वर्षे झाली. परंतु महापालिका क्षेत्रातील तीन ब्रिटिश कालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट तीन वर्षांत पूर्ण होऊ शकले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन ते अडीच वर्षे फाइली फिरल्यानंतर आता जानेवारी महिन्यात एका कंपनीला तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले, परंतु हे कामदेखील तीन महिन्यांत पूर्ण झाले नसून अद्यापही महापालिकेला अहवाल अप्राप्त आहे.गुरुवारी (दि.१४) सीएसटी येथील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना साताऱ्याजवळ घडली होती. अशी दुर्घटना घडली की राज्यभरात तपासणी आणि सतर्कतचे आदेश दिले जातात. परंतु त्यानंतर मात्र गांभीर्य नष्ट होते. नाशिक महापालिकेत पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची फाइल डॉ. प्रवीण गेडाम आणि त्यानंतर अभिषेक कृष्ण यांच्या कालावधीत सुरू झाली. तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कालावधीत तर ही फाइल अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आली. मुंढे यांची बदली आणि तत्कालीन शहर अभियंत्यांची निवृत्ती यांनतर विद्यमान शहर अभियंता संजय घुगे यांनी जुन्याच ठेकेदाराला त्याच दरामध्ये तीन पुलांचे काम करून देण्यास सांगितले. संबंधित ठेकदारदेखील तयार झाल्यानंतर जानेवारी महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले आणि संबंधित एजन्सीला अहिल्यादेवी होळकर पूल तसेच आडगाव येथील गावाला जोडणारा पूल आणि नाशिकरोडविभागातील वालदेवी नदीला जोडणार पूल असे तीन ब्रिटिश कालीन पूल आहेत, परंतु या तीन पुलांचे आॅडिट १५ मार्चपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने अहवाल मागवला आहे. ज्या तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश होते ते ब्रिटिश कालीन म्हणजेच शंभर वर्षांपूर्वीचे आहेत. त्यातील नाशिक आणि पंचवटीला जोडणारा गोदावरी नदीवरील ब्रिटिश कालीन व्हिक्टोरिया पूल आता नाशिककरांना अहिल्यादेवी होळकर नावाने परिचित असून, तो ब्रिटिशांनी १८९५ साली बांधला. त्याचे शंभर वर्षांचे आयुर्मान संपल्यानंतर १९९७-९८ साली ब्रिटिश कंपनीने न विसरता नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आणि या पुलाचे आयुर्मान संपल्याचे कळवले. शंभर वर्षानंतरही कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग म्हणून ब्रिटिश कालीन कंपनीने जिल्हा प्रशासनाला न चुकता कळवले. तेथे मात्र राज्य शासनाचे आदेश प्राप्त होऊनही महापालिकेने अद्याप आॅडिट पूर्ण केलेले नाही हे विशेष होय. एकीकडे नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना म्हणजे द्रुतगतीने विकास अपेक्षित केला जात आहे.तिन्ही पुल ब्रिटिश कालीनमहापालिकेने अहिल्यादेवी होळकर पुलाचे आॅडिट करण्यास सांगितले आहे, सदरचा पूल १२४ वर्षांचा आहे. त्याचे आॅडिट अद्याप झालेले नाही. मात्र महापालिकेने त्याला समांतर जिजामाता पूल बांधला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर महापालिकेच्या हद्दीलगत आडगाव असून, गावात प्रवेशासाठी असलेला पूलदेखील ब्रिटिश कालीन असून, त्याची दुरवस्था झाली आहे. स्ट्रक्चरल आॅडिट होण्याच्या आतच महापालिकेने चालू अंदाजपत्रकात त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी तरतूद केली आहे.वालदेवी नदीवरील पूल हा अत्यंत जुना असून, तोदेखील ब्रिटिश कालीन असल्याने महापालिकेने त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट होण्याच्या आतच समांतर पूलदेखील केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक