पाथर्डी रोडवरील रहिवासी श्रीकांत प्रसाद लोखंडे (रा.विशाखा लनी,पाथर्डी रोड) हे गेल्या गुरुवारी (दि.४) मुंबईनाका भागात आले होते. त्यांनी एका कार्यालयाबाहेर आपली स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ एचडी १९८८) उभी केली असता चोरट्यांनी ती चोरी केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सिडको परिसरात घडली. नांदुरनाका येथील शुभम महेश गर्गे (रा.संत जनार्दन नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गर्गे मंगळवारी (दि.२) सिडको भागात आले होते. संभाजी स्टेडियम परिसरात त्यांनी आपली पॅशन-प्रो दुचाकी (एमएच १५ डीएस १८५०) उभी केली असता त्यांची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत कुमार नारायण बर्वे (रा.गोरेवाडी, जेलरोड) यांची पल्सर दुचाकी (एमएच १५ व्हीटी ८४९) रेजिमेंटल प्लाझा पाठीमागे एका दुकानासमोर उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे.
शहरामधून तीन दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST