शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यातील चोरीप्रकरणी तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 01:40 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील गावठा परिसरातील कॅपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्नसोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मात्र घटनेतील तीन संशयित आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले असून एकाने पळ काढला आहे. पोलिसांनी आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.

ठळक मुद्देइगतपुरी : मुद्देमालासह ४८ तासांत घेतले ताब्यात
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील गावठा परिसरातील कॅपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्नसोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मात्र घटनेतील तीन संशयित आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले असून एकाने पळ काढला आहे. पोलिसांनी आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.याबाबत ताराचंद केवलचंद बबेरवाल रा. घोटी यांनी फिर्याद दाखल केली होती. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमून महाराष्ट्र पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला. परिसरातील फोटो शूटिंगच्या आधारे तपास सुरू केला असता पोलीस ग्रुपच्या आधाराने आरोपी व त्यांचे मोबाईल नंबर मिळून आले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत असताना संबंधित आरोपी मुंबई येथील मीरा भाईंदर परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काश्मीरा पोलीस मुंबई यांना तपासकामी मदतीला घेत घटनेतील आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले. यात तीन आरोपी मिळाले असून यापैकी एकाने पळ काढल्याने तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.सुमारे ६ लाख ११ हजार रुपये किमतीच्या चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडे मिळून आला. या घटनेतील संशयित आरोपी अतिश अमर ससोदिया (वय २० वर्ष, रा. पोस्ट पिपलीया, ता. पचौर, जिल्हा राजगड, मध्यप्रदेश), निखिल रवि ससोदिया (वय, १९ वर्ष, रा. पिपलीया, मध्यप्रदेश) आणि करण महावीर सिंग (वय २३ वर्षे, रा. पडकोली, पो. पुराकनेरा, ता. बहा, जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया फरार असून पोलीस शोध घेत आहेत. इगतपुरी पोलिसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध ४८ तासांत लावल्याने तालुक्यात व जिल्ह्यात इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव, पोलीस नाईक मुकेश महिरे, पोलीस कॉ. सचिन बेंडकुळे, राजेंद्र चौधरी, बोराडे, विजय रुद्रे आदी करीत आहेत.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीArrestअटक