शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची रक्कम घेताना वनपालासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 01:45 IST

पूर्व वनविभागाच्या वणी वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ कार्यालयात वनपाल आणि दोन वनरक्षकांना लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देरंगेहाथ पकडले :  एक लाख रुपयांची मागणी 

नाशिक : पूर्व वनविभागाच्या वणी वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ कार्यालयात वनपाल आणि दोन वनरक्षकांना लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ ताब्यात घेतले. वणी जवळील चिंचखेड गावातील शेतजमिनीच्या बाजूस असलेल्या एका वनक्षेत्रातून खोदलेल्या चरावरून पाण्याची पाईपलाईन शेतीपर्यंत टाकण्याच्या कामाला परवानगी मिळावी, याकरिता तक्रारदाराने वनाधिकारी यांच्याकडे विनंती केली होती. दरम्यान, वनाधिकारी, कर्मचारी यांनी त्याच्याकडून १ लाख रुपयांची मागणी केली.   यावरून तक्रारदार आणि या वन कर्मचाऱ्यांमध्ये तडजोड होऊन ५० हजारांची रक्कम देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदारांनी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. यानुसार पथकाने खात्री करीत पंचांसमक्ष पडताळणी केली आणि सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५० हजारांची रक्कम देण्यासाठी तक्रारदार शेतकरी हे वणी येथील वन परिमंडळ कार्यालयात आले असता त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना वनपाल अनिल चंद्रभान दळवी (५०, रा-विंचूर दळवी, ता. सिन्नर), वनरक्षक उस्मान गणीमलंग सय्यद (४९, रा. फॉरेस्ट कॉलनी वणी) आणि सुरेखा अश्रुबा खजे (रा. संस्कृतीनगर,वणी) यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनाही या गुन्ह्याच्या कारवाईची प्रत सादर केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीArrestअटक