शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दगडफेकप्रकरणी तीघे ताब्यात; दोन दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:13 IST

नाशिक : जुने नाशिक परिसरातील आझाद चौकात लॉकडाउनमध्ये रविवारी (दि.९) रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक व वाहनांची तोडफोड करत ...

ठळक मुद्देगावठी पिस्तूलसह गुप्ती, कोयता जप्त8 दंगलखोर अद्याप फरार असून त्यांची ओळख पटली

नाशिक : जुने नाशिक परिसरातील आझाद चौकात लॉकडाउनमध्ये रविवारी (दि.९) रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक व वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविण्याची घटना घडली होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तीघा संशयितांना अटक केली आहे. अन्य आठ दंगलखोर अद्याप फरार असून त्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले.जुन्या नाशकातील चव्हाटा येथील आझाद चौकात काजीपुरा, तपोवन, द्वारका, पंचवटी या भागातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके समोरासमोर आले. त्यांनी स्वत: जवळ बाळगलेले पिस्तुल, गुप्ती, कोयत्यासारखी घातक शस्त्रे काढत एकमेकांना धमकावत दंगल माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच एकमेकांच्या दिशेने दगडफेकदेखील केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र डझनभर युवकांनी एकत्र येत घातलेल्या धुमाकुळमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक दत्ता पवार, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरिक्षक जितेंद्र माळी हे पोलीस फ ौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत दंगलखोर टोळके घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तासांतच या गुन्ह्यातील सहभागी संशयित अनंत राजेंद्र पाटील (१९, रा.अमरधाम), दिपांशु राजेंद्र आव्हाड (२०,रा.कृष्णापार्क, तपोवन), गौतम संतोष रंजवे (१९,रा.मातंगवाडा, द्वारका) या तीघांना अटक केली आहे. यांना जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पुढील दोन दिवस त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.या गुन्ह्यात आकाश भाग्यवंत (रा.जेजुरकरमळा, तपोवन), राहूल गुप्ता (रा.शनि चौक, पंचवटी), धनंजय गायकवाड व त्याचे साथीदार राजु वाघमारे, अक्षय कानडे (रा.आझाद चौक, भद्रकाली), सोनू, आकाश यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून जमावबंदी, संचारबंदीसह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले. या सर्व टोळक्याविरूध्द विविध कलमांन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तीघा संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल, गुप्ती, कोयता हे घातक शस्त्रे जप्त केले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक