शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'संसरी'मध्ये थरार : दरोडेखोरांसोबत पती-पत्नीची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 14:00 IST

झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या.

ठळक मुद्देदोघे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वीअपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर थरार रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीविषयीदेखील प्रश्नचिन्ह

नाशिक : मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संसरी गावातील मोदकेश्वर अपार्टमेंटमध्ये दरोड्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या दोघा दरोडेखोरांना प्रतिकार करत पती-पत्नीने झुंज दिली; मात्र यात त्यांना अपयश आले दोघे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संसरी गावात मोदकेश्वर अपार्टमेंट असून या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये दरोडेखोर असल्याचे गोडसे यांना पाय-या चढताना लक्षात आले. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत दरोडेखोरांचा प्रतिकार केला. यावेळी दोघा दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाल केली. झालेल्या झटापटीत गोडसे यांनी दरोडेखोराला पकडण्यास यश मिळविले; मात्र त्याच्या दुस-या साथीदाराने कोयत्याने त्यांच्यावर वार केल्याने ते पाय-यांवर कोसळले. यावेळी त्यांच्या आवाजाने घरातून त्यांची पत्नी धावत बाहेर आली असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोडसे यांनी त्यांना रोखले असता दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीला ढक लून दिले व पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाय-या उतरत असताना आवाजाने शेजारी राहणारा गोडसे यांचा पुतण्या अमितहा देखील बाहेर आला व त्याने हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून झटापट करत सुटका करुन घेतली. यावेळी हल्लेखोरांचा मोबाईल, चष्मा, जॅकेट घटनास्थळी पडले. या साहित्यांच्या आधारे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. अपार्टमेंटमध्ये घुसून दरोडा टाकण्याच्या या घटनेने संपूर्ण देवळाली कॅम्प, संसरी गाव परिसरात दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

--लष्करी छावणी असलेल्या देवळाली कॅम्प परिसरत सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. देवळाली येथे तोफखाना केंद्र, हवाई दलाचे मुख्यालय यांच्या लष्करी छावण्या आहेत. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी देवळाली कॅम्प पोलिसांवर आहे. रात्री तसेच दिवसाही पोलिसांनी डोळ्यात तेल घालून गस्त घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हाRobberyदरोडा